0
4
0
9
0
3
सोन्याचा पिंजरा
मोह,माया,ममतेनी
वेढले पूर्ण जीवन
गुंतून पडलो संसारी
वाढत गेले आकर्षण
मी मी करून सदा
राहिलो अहंकारात
आप्त,स्वकियांसाठी
श्रमलो मी दिनरात
जीवन एक आहे
जणू सोन्याचा पिंजरा
उडता येईना मनसोक्त
जबाबदारीचा पसारा
लाच लुचपत करून
जमवले खुप धन
कुणी न येई सोबती
शेवटी एकट्याचे निर्गमन
गुंतू नको मानवा
मोह मायेच्या पाशात
सोड सोन्याचा पिंजरा
झेप घे आकाशात
मिळव अगणित ज्ञान
जाण जीवनाचा अर्थ
जप संतांची शिकवण
कळेल जीवन मतितार्थ
श्रीमती सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





