बा. ना.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये सदाभाऊ पेंडसे ट्रस्टतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बा. ना.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये सदाभाऊ पेंडसे ट्रस्टतर्फे वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात आ. सा. धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शालेय समिती विद्यमान सभासद मोरेश्वर म्हसकर, यांच्या अध्यक्षते खाली सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्या तर्फे बुधवार दि.२७ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच स्वर्गीय सदाभाऊ पेंडसे व स्वर्गीय निर्मला पेंडसे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी केले.
यानंतर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने यशस्वी झालेल्या म्हात्रे पायल संजय [ इ. ९ वी अ ] व म्हात्रे ध्रुवी राजेंद्र [ इ.११ वी कला ] या विद्यार्थीनींनी स्पर्धेतील विषयावर भाषणे केली. यानंतर सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्यातर्फे दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झालेल्या पुढील विद्यार्थीनींना दरवर्षी प्रमाणे रोख रक्कम, आकर्षक चषक, प्रशस्ती पत्रक व फुलझाडे देऊन गौरविण्यात आले.
*स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीनी पुढील प्रमाणे–*
*इ. ११ वी, इ. १२ वी गट*–
*प्रथम क्रमांक-* म्हात्रे ध्रुवी राजेंद्र [ इ.११ वी कला ]
*द्वितीय क्रमांक-* म्हात्रे सई सुबोध [ इ.११ वी वाणिज्य ]
*तृतीय क्रमांक-* लांडगे अंकिता अंकुश [ इ.१२ वी वाणिज्य ]
*इ.९ वी, १० वी गट*–
*प्रथम क्रमांक*– म्हात्रे पायल संजय [ इ.९ वी अ ]
*द्वितीय क्रमांक*– माने पूर्वा संजय [ इ.१० वी ब ]
*तृतीय क्रमांक*– पाटील अवंती शांताराम [ इ.९ वी अ ]
यानंतर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे मार्गदर्शक व शिक्षण क्षेत्राविषयी विशेष आवड असणारे धनंजय नरेंद्र मुंगळे, मुंबई यांच्या शाळेसाठीच्या योगदानासाठी त्यांचे प्रतिनिधी संदीप भगत यांचा सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्या तर्फे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व फुलझाड देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट, पुणे यांच्या तर्फे शाळेला १० पुस्तके भेट देण्यात आली तसेच इ. ९ वी ते इ.१२ वी मधील २० गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून प्रत्येकी १२०० रुपये याप्रमाणे एकूण २४००० रुपये रोख स्वरुपात दरवर्षी प्रमाणे देण्यात आले. कार्यक्रमाला आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा शालेय समिती विद्यमान सभासद मोरेश्वर म्हसकर, संस्थेचे सभासद परशुराम म्हात्रे, सदाभाऊ पेंडसे ट्रस्टच्या ट्रस्टी शुभांगी वर्तक, अनुराधा कान्हेरे, मंदार वर्तक तसेच धनंजय मुंगळे यांचे प्रतिनिधी संदीप भगत, बा.ना.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी परशुराम म्हात्रे, शुभांगी वर्तक यांनी मनोगत व्यक्त केले तर मोरेश्वर म्हसकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांनी तर आभार प्रदर्शन आशिष राणे सर यांनी केले. पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमा नंतर सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सदाभाऊ पेंडसे ट्रस्ट यांच्या तर्फे अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.





