बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवास मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर [ कुसुमाग्रज ] यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मराठी भाषा गौरव दिन मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या नियोजनातून व मार्गदर्शनातून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी अतिशय सुंदर असे फलक लेखन केले. दुपार सत्रात सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्यासह उपस्थित सर्वांनी कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर [ कुसुमाग्रज ] यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांची महती सांगितली. तसेच त्यांनी संकर्षण कऱ्हाडे यांची आई कविता सादर केली.
त्यानंतर प्रियंका राणे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून कुसुमाग्रज व मराठी भाषा गौरव दिना विषयी महती सांगितली.
त्यानंतर विशाल पाटील सर व प्रियंका राणे मॅडम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी या गीताचे समूह गायन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इ. ५ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी कविता सादरीकरण, भाषण, इंग्रजी शब्दांचे मराठीत अर्थ सांगणे, वाक्प्रचारांचा अर्थ सांगणे, मराठी भाषेतील म्हणी सांगणे, मराठी भाषेतल्या अलंकारां विषयी माहिती सांगणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय भगत सर यांनी तर आभार प्रदर्शन दिलिप चव्हाण सर यांनी केले.
सकाळ सत्रात इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दत्तात्रय अहिरे सर यांनी तर सूत्रसंचलन कैलास शिकारे सर यांनी केले. दोन्ही सत्रातील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोल सहकार्य केले.





