0
4
8
2
8
6
वेड्या मना
वेड्या मना तू थांब रे जरा
किती धावशील वेड्यापरी
क्षण आजचा कळेना मज
झाली गत कस्तुरीमृगापरि…!!१!!
दुःखाच्या चक्रव्यूहात असा
नको बनू रे अभिमन्यू मना
मुसळधार अश्रूधारेत वाहून
लाख मोलाचा श्वास तू घेना…!!२!!
तुटली जरी कैक स्वप्ने तुझी
असतील कदाचित लहान
ठेव विश्वास दृढ स्वतः वर
घडेल नक्की कार्य महान…!!३!!
वेळ कोणती नाही कायम
दे सोडून रे उद्याची चिंता
उगवेल उद्याची नव पहाट
अन सुटेल आपोआप गुंता..!!४!!
हार कदापि तू मानू नकोस
वेड्या मना एवढंच सांगते
चालणाऱ्याला मार्ग सापडे
इथे कोणी ना कायम थांबते…!!५!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
========
0
4
8
2
8
6



