
0
4
0
9
0
3
संवेदना
आपल्या वर्तमानात भरू कधीतरी
गतकालीन भावनिक हर्ष क्षणांना
अंतरातील भावना उधाणतील मग
मिश्किल होतील बर मूक संवेदना…
जरी आपण आत्ता मोठे असलो तरी
होवूया न आपण कधी लहान मूल
निरागसतेने आपल्याच मित्रांसवे
मांडूया लहान भातुकलीची चूल ….
लहानपण देगा देवा परत म्हणत
सुगंध लुटूया गंधीत रंगीत फुलांचे
हवे तसे या वसुधेवर मस्त बागडूया
रंग घेवूया आपण फुलपाखरांचे….
चिवचिवणार्या चिमण्यांसवे अंगणात
त्यांचे दाणे टिपणं नजरेनं न्याहळूया
त्यांच्याही मनीची संवेदना जाणून घेवू
घरटी चिमण्यांसाठी झाडावर बांधूया…
अंगणात परसदारी झाडेवेली लावूया
मूक पक्ष्यांच्या वेदना जाणून घेवूया
त्यांच्यासाठी अंगणी चारापाणी ठेवू
पर्यावरणाच्या समतोलासाठी तत्पर राहूया…
वसुधा नाईक,पुणे
0
4
0
9
0
3





