नागपूरच्या विद्यार्थिनी ठरल्या ‘राज्यस्तरीय चेस चॅम्पियन’
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
नागपूरच्या विद्यार्थिनी ठरल्या ‘राज्यस्तरीय चेस चॅम्पियन’
कर्नाटक येथे झालेल्या स्पर्धेत ‘कॉम्बट चेस अकॅडेमी’चे यश
शहर प्रतिनिधी, अखिल रोडे
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर : हरपनहळ्ली,कर्नाटक येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘सीबीएसई साउथ झोन टीम चेस टूर्नामेंट’ अंडर १४ मुलींच्या गटामध्ये नागपूरच्या ‘कॉम्बट चेस अकॅडेमी’च्या विद्यार्थिनी विजयी ठरल्या. विजयी झालेल्या विद्यार्थिनींची येत्या काही दिवसांत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
‘कॉम्बट चेस अकॅडेमी’च्या मुलींच्या टीममध्ये असलेल्या तनिष्का भारद्वाज हिने ५ पैकी ५, वंशिका अग्रवाल ५ पैकी ४, सिद्धी बागडिया ५ पैकी ३, कुवम मोदी – ५ पैकी ३ गुण मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. यासोबतच तनिष्का भारद्वाज हिने वैयक्तिक गटात प्रथम स्थान पटकावत ट्रॉफी जिंकली तर याच गटांमध्ये अकॅडमीची वंशिका अग्रवाल हिने तिसरे स्थानावर बाजी मारत ट्रॉफी जिंकली.
विद्यार्थिनींने मिळवलेल्या यशाचे कौतुकासह त्यांचा प्रशिक्षक असल्याचा अभिमान आहे अशा भावना ‘कॉम्बट चेस अकॅडेमी’चे संस्थापक व मुख्य प्रशिक्षक आकाश रेवतकर यांनी मांडल्या. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता विद्यार्थिनींना उत्तमरित्या प्रशिक्षित केले जाईल, जेणेकरुन ‘नॅशनल चॅम्पियन’चा मान पण नागपूरला मिळेल असा विश्वास ही रेवतकर यांनी व्यक्त केला. आज नागपूर रेल्वे स्थानकावर आकाश रेवतकर सहपरिवार उपस्थित राहून विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या यशा बद्दल अभिनंदन केले.





