
0
4
0
8
8
7
फू बाई फू
फू बाई फू फुगडी फू
आळी मिळी गुप चिळी
मी आणि तू ग मी आणि तू ||ध्रु||
मला हवी तुला हवी
प्राण्यांनाही हवी
वनस्पती सजीवांना
सांग काय हवी ? |१|
आता फुगडी फू __
रंग माझा काळा काळा
गोड गोड गळा
वसंतात फुटतो कंठ
सांग कोणा बाळा ? ||२||
आता फुगडी फू __
आकाशात लावलं आळं
त्याला आली फळं
टपटप पडतात खाली
अशी कोणती फळं? ||३||
आता फुगडी फू __
जन्मजात चिलखत
झाडाचे मी पिलू
गोड गऱ्याने तट्टम पोट
खाणार का ग नीलू ? ||४||
आता फुगडी फू
परात भरून लाह्या
मध्ये गोल बत्तासा
दिवसा उजेडी दिसेना
रात्री यांचा तमाशा . ||५||
आता फुगडी फू __
विमल धर्माधिकारी
वाई, जि.सातारा
0
4
0
8
8
7





