
0
4
0
9
0
3
सत्यमेव जयते
सत्यमेव जयते वचन हे
सदा राहो मनी निनादत
सत्याचा पाठीराखा व्हावे
त्याची कास धरावी सतत
असत्याचा होतो बोलबाला
त्यासी भुलू नये कधी
परिणामांचा विचार करावा
कोणताही निर्णय घेण्याआधी
सत्य एकटे पडले जरी
त्याचाच अंतीम विजय
खोट्याचे चाकर अनेक
परी त्यांचा होतो पराजय
सत्याच्या मार्गावर चालावे
होऊ नये कधी विचलीत
ध्येय असावे मनी निर्मळ
पाऊले पडावी नियमित
सत्यमेव जयते हे ब्रीद
आहे आपल्या भारतभूचे
असत्याला सारून दूर
कल्याण होईल जीवनाचे
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
========
0
4
0
9
0
3





