
0
4
0
8
9
0
आदर
मानसा सारखे । सर्वांनी वागावे
प्रेम वाढवावे । आपसात ॥१
अति लोभ नको । चिंतेचे कारण
समाधानी मन । प्रत्येकाचे ॥२
वाईट विचार । खोटाच प्रचार
नको तो प्रसार । करू नये ॥३
सतत कामात ।गुंतूनिया घ्यावे
सर्वांनी बनावे । दिर्घोद्योगी ॥४॥
कोणत्याही वेळी । खोटे ते टाळावे
खरे ते बोलावे । सदोदीत ॥५
मोठ्या माणसांचा । ठेवावा आदर
जोडावे ते कर । त्यांच्यापुढे ॥६
सत्याचा सन्मार्ग । नेहमी धरावा
धर्म तो पाळावा । माणूसकी ॥७
दीपककुमार र. सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा
============
0
4
0
8
9
0





