
0
4
0
9
0
3
खबरदारी
माती छान भुसभुशीत केली
आलटून पालटून नांगरली,
फास लागता रक्ताळलेल्या
पाऊलांनी जराशी भिजवली..!!१!!
घाम गाळला उभ्या मातीत
घोटा घोटानं भाकर गिळली,
आग ओकणाऱ्या भास्करान
होती नव्हती जवानी पिळली..!!२!!
आता कुठं निळ्या आभायात
गर्दी जराशी जमू लागली,
यावं यावं मेघगर्जना करीत
कळी मनाची खुलू लागली…!!३!!
घेईन खबरदारी सगळी राजा
बी बियाणं तयार ठेवीन,
नाही वापरणार जहर आता
निसर्गराजावर भरोसा करीन…!!४!!
ये रे बाबा असा भरभरून
नदी, नाले वाहू दे भरून,
शिवार सारे जाऊ दे ओलावून
आले पीक टरारा भरून…!!५!!
सविता धमगाये
जिल्हा नागपूर
=========
0
4
0
9
0
3





