
0
4
0
9
0
3
चोरकप्पा
चोरकप्पा हृदयाचा
ठेवला तसाच राखून
सांगावे कोणाला दुःख
हृदय गेले ग गुंतून
त्या आणाभाका,शपथा
होत्या का नुसत्या थापा
मी मात्र जपल्या आहेत
हृदयी माझ्या त्या गप्पा
होते का डावपेच ते
खेळण्या मम मनाशी
आर्त वेदना सांगताहेत
समजून वाग जगाशी
तन,मन,धन केले
अर्पण तुला तेव्हा
तुझ्या हृदयी नव्हती
किंमत माझी जेव्हा
जपून आहेत आठवणी
चोरकप्प्यात हृदयाच्या
तू मात्र कोरडा ठणठणीत
उगीच बढाया मारायच्या
सुलोचना लडवे
जि.अमरावती
=========
0
4
0
9
0
3





