0
4
0
9
0
3
श्रावण मास
ऋतू आला हा श्रावणाचा
घेऊन खेळ ऊन सावलीचा
वार सोमवार हा महादेवाचा
त्यांना अभिषेक दुधाचा!!१!!
व्रतवैकल्याची शिदोरी
येता श्रावणमास घरी
नागपंचमी येई याच सप्ताहात
नैवेद्य दाखवताना दूधभात !!२!!
पंधरा ऑगस्ट ला सुटली ती गुलामी
आत्मीयतेने देऊ तिरंग्याला सलामी
सण नारळी पुनवेचा
माझ्या कोळी बांधवाचा !!३!!
सण भाऊ बहिणीच्या नात्याचा
येई राखी पुनवेचा
कृष्ण जन्मला या मासात
दहीहंडी फोडाया तरुणाई हर्षात!!४!!
येता अमावास्येचा पोळा
पाऊस होऊन जातो भोळा
श्रावण मासाचं वातावरण अतिप्रसन्नतेचं
ठेऊ भान अनमोल निसर्गाच्या दानाचं!!५!!
सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे
श्रीवर्धन जि. रायगड
=======
0
4
0
9
0
3





