मराठीचे शिलेदार समूहाप्रती ऋणनिर्देश
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा"

मराठीचे शिलेदार समूहाप्रती ऋणनिर्देश
“लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा”
खरंच बालपण हे अतिशय निरागस, निष्पाप, ताण तणावविरहित,मनसोक्त व मनमौजी जीवन असते. बालपणीची दोस्ती ही या विश्वातील सर्वात घट्ट अशी दोस्ती असते.या दोस्तीमध्ये क्षणाचा राग,क्षणाचा अबोला,क्षणाची कट्टी आणि क्षणात सारं काही विसरून पुन्हा जमते गट्टी,अशा प्रकारची ही दोस्ती असते.बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात हे अंतिम सत्य आहे.
बालकविता लिहिताना आपण आज किती जरी वयाने अनुभवाने मोठे असलो तरी आपल्याला आपला भूतकाळ आठवून बालपणातच जावं लागतं.तेव्हा कुठे या कवितेबद्दलचे शब्द सुचायला लागतात.पक्की दोस्ती या विषयावर बालकविता लिहिताना लहानपणापासूनचे सर्व सवंगडी मला आठवायला लागले.यामध्ये काही सवंगड्याने जीवनाला दिशा देण्याचे काम केलं आणि काही सवंगड्यांची साथ मी तेंव्हाच सोडली हे बरं झालं हे आता मला समजायला लागलं. बालपणापासूनची पक्की दोस्ती आजही मी कायम जपतो आहे,आणि यावरूनच मला पक्की दोस्ती ही बालकविता लिहिण्याचं बळ मिळालं.
नवल या गोष्टीचं वाटतं की, आपण गाढ झोपेत असताना रात्री अकरा वाजता राहुलभाऊंचा तुमचा फोटो पाठवा हा संदेश मी सकाळी वाचला आणि त्यांच्या कार्याचा मला हेवा वाटला.क्षणाचाही विलंब न करता मी लगेच माझा फोटो पाठवून दिला.आणि उत्सुकता मनात याची होती की कोणती रचना सर्वोत्कृष्ट पोस्टर वर झळकेल.
काही वेळातच पक्की दोस्ती ही बालकविता सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकली आणि मला आनंद झाला.सर्वेसर्वा राहुलभाऊ,सविताताई, स्वातीताई, वैशालीताई, तारकाताई, वृंदाताई,विष्णू दादा,संग्रामदादा,प्रशांत भाऊजी यासह माझ्यावर शुभेच्छारुपी आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या शिलेदार समूहातील ताई दादांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह





