ई-पेपरकविताखानदेशदादरा नगर हवेलीदेश-विदेशनागपूरनाशिकमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चाहूल थंडीची
सविता पाटील ठाकरे
0
4
0
9
0
3
चाहूल थंडीची
आवडतं मला तुझं
अस्स भन्नाट लिहीणं..
गाते जशी लेखणीतून
पावसाचं गाणं..
शब्दांच्या भेटीसाठी मन
घाली पायात पैंजण..
मिळती मग सुखाची
तुला चार दोन दाणं..
कधी चाहुल थंडीची
अन् गार वारा..
त्यात भावनांच्या पडती
धुंद टपोर गारा..
कधी फुंकर घालूनी
विझवितेस निखारा..
धुक्यापलीकडे पाझरे
अमृताचा झरा..
बनते स्वतःच चालक
नवी दुनिया बांधते..
जातीभेदांच्या भिंतींना
काव्यातून गं सांधते..
दीन दुःखी दलितांना
गोड घास तू रांधते..
खुदा राम येशूसाठी
प्रेमझरा तू खंदते..
सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
0
4
0
9
0
3





