
0
4
0
9
0
3
अन् पैसा झाला खोटा
ठेवा जाणीव, मुलांनो
पैसा कमावतो कोण?
मायबाप,श्रमतो उपाशी
आणि गमावतो कोण?
माझी माणसं,माझे घर
करीन त्यांच्यासाठी कमाई,
घरप्रमुख झेलतो संकटे
पण,होईना कोणी उतराई.
जन्मा आला, दिवटा पोटाला
अन,पैसा झाला खोटा
बेभावात विकी जमीनजुमला
घाली,मायबापाच्या माथी गोटा.
मित्र त्यांचे व्यसनी
छंद त्यांचे दारू पाणी,
बायका पोरासोबत मारझोड
सर्वांच्या डोळ्यात येई पाणी.
आजच्या बिघडलेल्या थडीचा
काही भरोसा राहिला नाही,
स्वतः साठी,हीं जगा तुम्ही
हा मानव,जन्म पुन्हा नाही.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत, जि परभणी
0
4
0
9
0
3





