0
4
8
2
8
4
स्वरांगण
निसर्ग हा नवरसांनी भरला
सप्तसुरे अणूरेणू निनादला
रंगगंध अंगांगी दरवळला
दिशांतरी स्वरनाद झरला
पंचम स्वरात गातो कोकिळ
झऱ्यात भरला नाद खळखळ
पर्णे झुलती सळसळ सळसळ
नादावत हा वारा अवखळ
पक्षी गणांची मधुर कुजबूज
दर्याची घुमते गंभीर गाज
वेळू बनातची हा पखवाज
तरुवेलींवर साजे पुष्पसाज
मेघमल्हार राग रंगला
नृत्यांगना लखलख चपला
स्वरांगण स्वरांत भिजूनी
जलधारांनी ताल धरला
आनंदाचा ऋतू हा आला
कणकण गीताने भारला
दऱ्या डोंगरी झिम्मा गाणी
अलवार कुणी सूर छेडला
वृंदा(चित्रा)करमरकर
सांगली जिल्हा सांगली
==========
0
4
8
2
8
4



