
0
3
4
5
8
9
येता जाता
सोंग रचूनीया ढोंग करती,
कुणी पदोपदी या जीवनात…
विश्वासाला विश्वासामध्ये,
गुरफटे काटेरी कुंपणात…१
आमिष दाखवून सोनेरी,
देती हाती कास्याचे भंगार…
कुटील निती डाव राखूनी,
चौफेर पेटविती अंगार…२
कुणी बनूनी येती सोबती,
केवळ आपुल्या मतलबापुरती..
साध्य होता नसे कुणी कुणाचे,
शिल्लक तेवढी राख उरती…३
‘येता जाता’ भेटतील सहज,
केवळ स्वार्थपिपासू प्रवृत्ती…
‘सुधाकरा’ स्वतः जपा जपा,
चौकस आणिक जागृत वृत्ती…४
सुधाकर भुरके
आर्य नगर नागपूर
==========
0
3
4
5
8
9