सिर्सी येथे रमाई जयंती मोठ्या उत्सवात साजरी
बुद्ध विहार परिसरात "जय भीम,जय रमाई" नावाचा जयघोष
सिर्सी येथे रमाई जयंती मोठ्या उत्सवात साजरी
बुद्ध विहार परिसरात “जय भीम,जय रमाई” नावाचा जयघोष
प्रतिनिधी :- अखिल रोडे
नागपूर / सिर्सी:- सिर्सी नगरीत हरवर्षी प्रमाणे याही वर्षी रमाई बुद्ध विहार , बौध्द पंचकमेटी, जयभीम एकता मंडळ व भारतीय दलित पँथर यांच्या संयुक्त विधमाने रमाई जयंतीचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ७/२/२०२५ सकाळी ९.३० वा. त्यागमुर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निम्मित बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिर्सी येथील सरपंचा वंदनाताई बुटे.प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच अतुल नारनवरे , सिर्सि सर्कल जिल्हा परीषद सद्यस मिलिंदजी सुटे प्रदिप पाटील सर , संगिता गजभिये प्रा. क्रांतिज्योती सावित्रीबाई कॉन्व्हेन्ट तथा ( ISRA) महिला अध्यक्ष नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदीप पाटील सर यांच्याकडून सर्व नागरीकांसाठी विहार परीसरात अल्पआहाराचे आयोजन करण्यात आले होते.
रमाई जयंती कार्यक्रम साजरा करण्याकरीता पँथर यशवंत अंबागडे , रुपेंद्र आंबुलकर सर , संजय मेंढे, उमेश कांबळे, संघर्ष अंबागडे, गोलू सुटे, मंगेश पाटील, प्रशांत भगत, कपिल मेंढे, सविन गजभिये, उत्तम जुनघरे, राजु सुटे, बालकदास सुटे, प्रभाकर मेंढे, रोहित सोनेकर,अशोक जुनघरे , वनमाला कांबळे ( अंगनवाडी सेविका ) , सत्यभामा कांबळे, जोत्सना मेंढे, चैताली तामगाडगे,वंदना अंबागडे, धारा हाडके, समता अंबागडे, पिंकी सुटे, सुनंदा सुटे, शोभा सुटे, सोनू मेंढे इत्यादी बौध्द उपासक, उपसिका यांनी परीश्रम घेतले.