ई-पेपरकवितागडचिरोलीनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंधसोलापूर
गुलमोहर
वृंदा (चित्रा)करमरकर

0
4
0
9
0
3
गुलमोहर
गुलमोहर हा किती फुलावा
अंगोपांगी बहरून यावा
याचे फुलते रुप देखणे
राग सौख्याचा आळवावा
लाल केशरी साज लेवूनी
गुलमोहर हा किती सजला
फांदी फांदी फुलून आली
गुलमोहर कसा गाली हसला
झाल्या हिमरेषा का सगळ्या
तीव्र उन्हाच्या तापत्या झळा
जन्म जरी नसेची इथला
कसा इथलाच होऊन गेला
अंगांग असे खुलून यावे
रंग बावरे होऊन जावे
भर उन्हातही आनंदाने
शीतल चांदणे ते पेरावे
सहनशीलतेचा हा पुतळा
संदेश देत असे आगळा
दु:खातही सुख शोधावे
जीवन मग आनंद सोहळा
वृंदा (चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
=======
0
4
0
9
0
3





