
0
4
0
9
0
3
पेटवू मशाली
अंतर्मन सांगे मजला
मीच खरी वैभवशाली
कोटी संपत्ती नसेल जरी
वाटे मी तर भाग्यशाली ॥
गोंडस ती चेहरे दिसता
हरपतो सारा ताण
भविष्यास त्यांच्या आकार देण्या
करावे जीवन सारे अर्पण ॥
आनंददायी शिक्षण देऊनी
आणूया शिक्षणप्रवाहात
अध्ययन निष्पत्ती साध्य करण्या
चला झटूया दिनरात ॥
कृतीयुक्त शिक्षण देऊनी
सक्षम बालक घडवूया
सुजाण नागरिक या देशाला
शिक्षक होऊनी देऊया ॥
संस्काराचे सिंचन करूनी
जीवनात भरूया खुशाली
साक्षरतेचा प्रकाश करण्या
ज्ञानदानाच्या पेटवू मशाली ॥
सरला टाले
राळेगाव यवतमाळ
========
0
4
0
9
0
3





