
0
4
0
9
0
3
पडद्याआड
कोऱ्या कागदावर उमटे
मनातली घालमेल जेंव्हा
आतुरता वाट पाहण्याची
पत्र दारात यायची तेंव्हा
लाल लाल रंगात नटलेली
ऐटित दिसायची पत्रपेटी
लिफाफ्यात बंदिस्त भाव
वाचतांना भावनांची दाटी
जगण्याचा खजिना होता
पडद्याआड हो लपलेला
इमोजीच्या या चेहऱ्यांनी
मनुष्य आनंदात खुललेला
दोन सेकंदात निरोप जातो
आतुरता गोडवा कुठं काय?
मोबाईलच्या मायाजालात
नात्यांचा गुंता वाढत जाय
अक्षरांच्या उबदार स्पर्शाचा
संपलाय आज इथे ओलावा
नेटवर्किंगच्या माध्यमातूनच
नात्यात सुरू कृत्रिमतेचा ठेवा
माधुरी घनश्याम कावडे
तालुका वणी,जिल्हा यवतमाळ
0
4
0
9
0
3





