0
4
0
9
0
3
बाईपण
सदा जिम्मेदारीचं ओझं
नाते निभावण्याचं कोंदण
जन्मल्यापासून तुझे नारी
जीवन मुसळातले कांडण
सर्वोच्च निर्मिती तुझी
निसर्गातील तू कुंदन
घातल्या जाचक अटी
अन् व्यवहारातील तू बंधन
बुद्धी चातुर्यात अग्रेसर
परि दुय्यम दर्जाचे रुदन
मनातच विचार तुझे
मनातच सारे आक्रंदन
कुटुंबाची तू धुरा
सौभाग्याचे असशी गोंदण
थोर तुझे मातृत्व
करी न समाज मंथन
कुठेही जा पुढे तू
पुरुषी अहंकाराचे लांच्छन
तुझ्याच संस्काराचे मोती
आडवे आणते बाईपण
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
0
4
0
9
0
3





