आषाढी पौर्णिमा आणि वर्षावास
कुसुमलता वाकडे दिघोरी रोड,नागपूर
आषाढी पौर्णिमा आणि वर्षावास
भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कारण त्याच्या जीवनातील चार घटना आषाढ पौर्णिमेलाच घडल्यात.कपिलवस्तू मध्ये शाक्य लोक राहायचे. शाक्य लोक दरवर्षी आषाढ पौर्णिमेला उत्सव साजरा करायचे, हा उत्सव सात दिवस चालायचा. हा उत्सव साजरा झाल्यावर शेवटच्या दिवशी राजा शुध्दोधन व महाराणी महामाया या उत्सवात गोरगरीबांना दानधर्म करायच्या. त्याच रात्री राजा शुध्दोधन व महामायादेवी शयन कक्षात झोपले असता महामायादेवीला सुंदर स्वप्न पडले स्वप्नात सुमेध नावाचा बोधिस्तव पांढरा हत्तीच्या रूपात व पांढरा कमळ हातात घेऊन आला व म्हणाला, “माते मी माझा शेवटचा जन्म तुझ्या कुशीत घेणार आहे, तु माझी आई होशील का ?” महामायादेवी आनंदाने “हो” म्हणाली, आणि तो सुमेध बोधिस्तव तिच्या शरीरात सामावला आणि ती जागी झाली.तिला स्वप्ननाचा अर्थबोध झाला नाही.
राजाला पहाटे पडलेल्या स्वप्ननाबद्दल सांगितले.शुध्दोधन राजाने स्वप्नविघेत पारंगत असलेल्या आठ ब्राह्मणांना निमंत्रित केले.ब्राह्मणानी महामायेला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.”राजा तुझी पत्नी पुत्रवती होणार आहे तुला होणारा पुत्र सम्राट चक्रवती राजा होईल किंवा त्यांने संन्यास घेतला तर तो महान बुद्ध होईल.”असे भाकीत त्यांनी वर्तविले. आणि खरोखरच त्या पौर्णिमेला गर्भधारणा झाली म्हणूनच आषाढी पौर्णिमेला ‘गर्भमंगलदिन’ असेही म्हणतात.
दुसरे आषाढ पौर्णिमेचे महत्त्व असे की, सिध्दार्थ गौतम 29 वर्षाचे असताना शाक्य संघ व कोहली यांच्यात रोहणी नदीच्या पाणी वाटपावरून भांडण सुरू झाले.शाक्य संघाने कोहलीन विरुद्ध युध्द करण्याचा संघाच्या बैठकीत ठराव पास झाला व त्या ठरावाला सिध्दार्थ गौतमांनी विरोध केला तंटाप्रमाणे शाक्यांची दोन माणसे व कोहली यांची दोन माणसे अशा चार माणसांनी एक माणूस निवडूण अशा पाच माणसांनी तंटा कमिटीने मिटवावा असा ठराव मांडला. गौतम संघाच्या ठरावाच्या विरोधात गेलेत. पंरतु सिध्दार्थाच्या ठरावाला कुणीही पाठिंबा दिला नाही.अशा सदस्याला शिक्षा ठरलेली होती त्या नियमाप्रमाणे संघाने सिध्दार्थ गौतमास पुढील पैकी तीन पर्याय सुचविले. एक देहदंड, दुसरा आई वडीलाची मालमत्ता जप्त किंवा कुंटुबावर सामाजिक बहिष्कार आणि तिसरा पर्याय ठेवला तो सैन्यात भरती होऊन युध्दास तयार होणे. तेव्हा सिध्दार्थ म्हणालेत यात माझ्या आईवडीलाचा दोष नाही. त्यांची मालमत्ता जप्त करून नका. त्याच्यावर सामाजिक बहिष्कारपण घालू नका हे सर्व माझ्यामुळे घडले तेव्हा माझी शिक्षा मला भोगू द्या.
तेव्हा संघ म्हणालेत की, तुला मृत्युदंड किंवा देशत्यागाची शिक्षा दिली आणि हे कोशाधिपतीस माहित पडले तर ते संघाला जाब विचारतील गौतम म्हणालेत हिच अडचण असेल तर मी परिराजक होऊन हा देश सोडून जातो मग तर झाले. संघाला हा तोडगा पसंत पडला आणि सिध्दार्थ गौतमाने गृहत्याग केला त्यादिवशी आषाढी पौर्णिमा होती.भारद्वाज ऋषीच्या आश्रमात प्रवज्या घेतली तो आषाढी पौर्णिमेचाच दिवस होता. या दिनाला महावेलीस क्रमणदिन असेही म्हणतात.
तिसरे आषाढी पौर्णिमेचे महत्त्व म्हणजे वेगवेगळया गुरूच्या आश्रमात सहा वर्ष कठोर तप व ज्ञान संपादन केल्यावर गौतम बुद्धांनी वयाच्या पस्तीसव्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी गया येथे सम्यंक संबोधी प्राप्त झाल्यावर सात आठवडे तथागत गौतम आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आनंद घेत होते.आठव्या आठवड्यात हे ज्ञान कुणाला द्यावे असा विचार करीत असताना त्याच्या समोर ब्रहस्पति उभा राहतो आणि सम्यकसम बुद्धाला विनंती करतो की, बुद्धाचा जन्म झाला अशी जगभर वार्ता पसरली आहे आपण बुद्ध झालात आपण जगाला अंधारातून मुक्त केले पाहिजे आपण हे कसे नाकारू शकता तेव्हा ब्रम्हस्पतिची विनंती मान्य करून तथागत हे ज्ञान मानवास देण्यास तयार झालेत.
आपल्या धम्माचा पहिला उपदेश कुणाला देऊ असा विचार त्याच्या मनात आला. भगवान बुद्धास प्रथम गुरू अलार कलामाची आठवण झाली. ते विद्ववान शहाणे आणि बुध्दिमान आहेत त्यांना धम्म उपदेश करावा असे त्यांनी ठरविले. पण ते मृत्यू पावले असे त्यांना समजले.नंतर उदकामयुक्त याला धम्म ज्ञान देऊ पण तेही मृत्यू पावले होते. नंतर त्यांना आपल्या पाच परिराजकांची आठवण झाली.बुद्ध बुद्धगये वरून 250 किमी पायी चालत सारनाथ येथे गेलेत जेव्हा सुजाताची खीर खाल्यामुळे स्त्री स्पर्शनी भंग झालेत तेव्हा बुध्दांना सोडून हे परिराजक मित्र निघून गेलेत जे की सुजाताची खीर खाल्ल्यावरच बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली. बुद्ध जसजसे आपले मित्र अस्सजि,महानाम,भद्दिय,वप्प,कोण्डण्णच्या जवळ जात होते.
हे ढोंगी आहेत आपण यांचा आदर करायचा नाही असे त्यांनी ठरविले पण बुध्द त्याच्या जसजसे जवळ जात तसाच त्याच राग दुर झाला एकानी बुद्धांचे भिक्षुपात्र,एकांनी चिवर तर एकाणी बसण्यास आसन दिलेत. सारनाथ येथे या पाच भिक्कूना बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मूलमंत्र देवून आषाढी पौर्णिमेला याच दिवशी बुध्दांनी पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले होते.आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने धम्माची पाळेमुळे खोलवर रोवल्या गेलीत.भिक्कू संघाची स्थापनाही आषाढ पौर्णिमेलाच झाली.गौतम बुद्धाला महान गुरू महान शिक्षक म्हणून मानले जावू लागलेत.
चौथी घटना म्हणजे बुद्धांच्या धम्मामध्ये अनेक भिक्कू सामील झालेत. असा भिक्कूचा मोठा संघ तयार झाला हा संघ धम्माच्या प्रचारासाठी गावोगावी पायी फिरत असे पावसाळयामध्ये त्या काळी पाऊस जास्त होत असे.पाऊसामध्ये भिक्कूचे खुप हाल होत असत. तेव्हा गौतम बुद्धानी सांगितले ,की एखादया विहारांमध्ये तीन महिणे राहून तिथेच धम्माचा अभ्यास करायचा व चर्चा करायची इथुनच वर्षावासाची सुरूवात झाली.ही घटना सुध्दा आषाढी पौर्णिमेलाच घडली.बुध्दांच्या काळापासून चालु झालेली वर्षावासाची परंपरा आजही चालू आहे म्हणूनच आषाढी पौर्णिमा व वर्षावास बुद्ध धम्मात महत्त्वाचे मानले जातात.
कुसुमलता वाकडे
दिघोरी रोड,नागपूर





