0
4
8
3
0
0
नाद
चंद्र कधी हसणार तुझा
निळ्या मम नभातला ।
भाव कधी फुलणार तुझा
आतूर या मनातला।।
गंधित रंगीत कळ्यामधुनी
फुले फुलती नकळत मनी।
नाद कधी कळणार तुला
भ्रमराच्या जीवातला।।
हिरव्या हिरव्या फांदीवरूनी
गीत गातो मी धुंद लोचनी।
शब्द कधी कळणार तुला
प्रीतीच्या गं सुरातला।।
साद ऐकूनि येशील धाऊनी
नक्षत्रांचा तू साज माळूनी।
स्पर्श कधी कळणार तुला
रेशमी या मिठीतला।।
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
========
0
4
8
3
0
0



