0
4
8
2
9
0
ताऱ्यांत हरवलेल्या आठवणी
उन्हाळ्याची रात्र होती
अंगणात पडलेले खाटेवर,
शर्यत लागली बांधवांत
मोजण्या तारे नभीवर.
नभीचे तारे मोजताना
हिशोब चुकून गेला,
मध्येच चांदोबा मामा
मनी सौंदर्य भरुनी गेला.
ऐकायच्या कथा विनोदी
तर कधी शूरवीरांच्या,
चारित्र्यवान होण्यासाठी
असे गुण शिकविण्याच्या.
झोप कधीतरी यायची
आम्हा कळायचेच नाही,
जिव्हाळा-प्रेम अंतरी कधी
भिनले कळायचेच नाही.
न राहिला तो बिछाना,
न ती रात्र उन्हाळ्याची,
आजी-आजोबांच्या सवे
वाटते सोबत गेल्याची.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
===========
0
4
8
2
9
0



