Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरभणीसाहित्यगंध

आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे: बी. एस. गायकवाड

0 4 8 2 9 3

आभारीय शब्दसुमने, दोन शब्द कृतज्ञतेचे: बी. एस. गायकवाड

आज सकाळी राहुल दादांचा फोन संदेश आलेला “तुमचा फोटो पाठवा” क्षणाचाही विलंब न करता लगेचच फोटो पाठवला. ‘तुमचा फोटो पाठवा’ हा संदेश खरोखरच मनाला सुखावून टाकणारा असतो. कारण आज आपली वर्णी नेमकी कोणत्या काव्य प्रकारासाठी लागणार याची उत्सुकता लागून राहिलेली असते. कारण जवळपास तिन चार काव्य प्रकारात लिहिलेले होते. काही वेळेतच त्रिवेणी रचनेचे पोस्टर झळकले. तसे दोन तीन वेगवेगळ्या आशयाच्या त्रिवेणी समूहात लिहिल्या होत्या. त्यातही त्रिवेणी म्हणजे वास्तवदर्शी आहे.

आमच्याकडे काही दिवसापासून आमच्या पुतण्याची छोटी मुलगी स्विटी रोज सकाळी येते.दिवसभर इकडेच थांबते. सायंकाळी जाते.खूप गोड बोलते. तिच्या साठी ही खास त्रिवेणी केली आहे.

तसेच याच सप्ताहात मंगळवारी तडजोड ही त्रिवेणी रचना देखील वास्तवदर्शी, अनुभवाधारीत लिहिलेली रचना सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकली होती. या सप्ताहात दोनदा, ते ही त्रिवेणी सर्वोत्कृष्ट रचनेस सन्मानित करून गौरविण्यात आले. तसेच मागील स्पर्धेच्या सप्ताहात देखील सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शनिवार या चार दिवशी सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, सचिव पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक सविताताई, वृंदाताई, स्वातीताई, तारकाताई, शर्मिलाताई, प्रशांत सर जी, विष्णू दादा, संग्राम दादा, अशोक लांडगे सर, अरविंद उरकुडे सर, सह सर्व प्रशासक टीम चे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.

तसेच शुभेच्छांचा वर्षाव करत सतत प्रेरणादायी प्रतिक्रिया देणाऱ्या समूहातील सर्व ताई दादा आणि जेष्ठ मार्गदर्शक यांचे मनःपुर्वक खूप खूप धन्यवाद. समूहात आल्यापासून सर्वच काव्यप्रकारात लिहिण्याचा प्रयत्न करत गेलो. सुरुवातीला अवघड वाटणारे प्रकार आता सोपे वाटत आहेत. हे आपल्याला जमेल का? असे वाटायचे पण ते जमू शकते. सातत्यपूर्ण लिखानामुळे, हे सरावाने अवगत होत गेले. आणि आजघडीला जरा हायकू काव्य प्रकार तितकासा जमत नाही असं वाटतंय. तरीही अधून मधून त्यात ही लिहिणे असते. समुहाने माझ्यासारख्या कितीतरी जणांना प्रकाशझोतात आणले आहे.

आज कविवर्य म्हणून उल्लेख होतो. एक वेगळी ओळख निर्माण झाली लोकं ओळखतात.ही केवळ आणि केवळ मराठीचे शिलेदार समूहाची देन आहे. याचे श्रेय समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा व शिलेदार समूह टीमला देतो. पुनश्च एकदा धन्यवाद देऊन सदैव आपल्या ऋणात राहणे पसंत करतो.

बी एस गायकवाड
पालम, परभणी
सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे