Breaking
कविताविदर्भसाहित्यगंध

वैष्णवांचा मेळा; श्रीमती सुलोचना लडवे

श्रीमती सुलोचना लडवे

0 4 8 2 9 3

वैष्णवांचा मेळा

देवाचिये द्वारी | गाती वारकरी |
विठ्ठल अंतरी | जपतसे ||१||
दुमदुमलीया | आज ही पंढरी |
नामजप करी | विठ्ठलाचा ||२||

गळा घालुनिया | तुळशीची माळ |
मृदंग नी टाळ | हातामध्ये ||३||
कस्तुरीचा टिळा | शोभतो ललाटी |
आनंदाची वाटी | अंतर्मनी ||४||

विठ्ठल रूक्मिणी | माझे मायबाप |
संसाराचा ताप | हरतसे ||५||
पाहुनिया डोळा |मुर्ती विठ्ठलाची|
साद अंतराची | समाधानी ||६||

वाटे देवा मज | यावे पंढरीला |
साद दे हाकेला | मायबापा ||७||
वैष्णवांचा मेळा | खुणावितो मज |
हरिनाम साज | करण्याशी ||८||

म्हणे सुलोचना | अंतरीचा ठाव |
ऐकुनीया धाव | विठूराया ||९||

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे