0
4
8
2
9
3
हरिणी गं तू
चपळ, चंचल, उत्साही
होतीस हरिणी गं तू
अडकली मोहजालात
झालीस बरणी गं तू..
टपोरे डोळे गालावर खळी
होतं सुरेख हसू मुखात
पडली वास्तवाची भूल
हरवलीस फेसबुकात…
नशिल्या डोळ्यांची होतीस
वारूणी गं तू
पण विसरलीस तू स्वतःला
माझे हरिणी गं तू..!
सोड तो नाद
दे आरोग्याला दाद
सांभाळ तू तब्येतीला
मिटेल आपलाही वाद..
नको नको भुलूस
फसव्या भुलभुलैय्यास
वरकरणी गं तू
माझे हरिणी गं तू..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
=====
0
4
8
2
9
3



