‘ऋणनिर्देश’ आभारीय शब्द सुमने; बी एस गायकवाड
दोन शब्द कृतज्ञतेचे, शिलेदार समूहाप्रतीचे...
‘ऋणनिर्देश’ आभारीय शब्द सुमने; बी एस गायकवाड
दोन शब्द कृतज्ञतेचे, शिलेदार समूहाप्रतीचे…
काल दिवसभर अभिनंदनीय शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. आणि विचारपूर्वक लिहिलेली रचना ‘सर्वोत्कृष्ट रचना’ठरल्याचे सार्थक वाटले. त्याला कारण ही तसेच होते, आदरणीय राहुल सरांनी शुक्रवारी ‘निसर्ग वाटाड्या’ हा विषय कविता समुहात दिला. खरंतर विषय येताच वेळ भेटला की,लगेच काही वेळात रचना लिहून समूहात पाठवत असतो. परंतू नुकतेच अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे देहावसान झाले होते. आणि दादांनी दिलेला विषय त्या घटनेशी निगडित आहे. याची लगेच खात्री झाली. तेंव्हाच ठरवले की रचना ही अरण्यऋषी यांना समर्पित, श्रद्धांजलीपर लिहावी लागणार आहे.
त्यांच्या विषयी सखोल माहिती घेणे अपेक्षीत आहे. म्हणून लगेचच लिहायचे टाळून, आधी ओझरती माहिती असतांनाही आणखी सविस्तर अरण्यऋषी मारुती चितमपल्ली वाचले आणि सायंकाळी शनिवारी रात्री ८: ५३ वाजता समूहात रचना टाकली. लगेचच सर्व काव्य प्रकारात निपुण असलेले आणि एका विषयावर पाच पाच रचना, तेही शीघ्र लिहिणारे आमचे स्नेही संजयजी पाचभाई सरांनी छान प्रतिक्रिया दिली. त्यानंतर कल्पवृक्ष आदरणीय राहुल दादांनी पण प्रेरक प्रतिक्रिया दिली. आदरणिय दादांची प्रतिक्रिया म्हणजे नव चैतन्य,नवऊर्जा देणारी आणि विशेष असते.शब्दात वर्णन करायला, शब्द ही खुजे पडतील. खूप विशालता आहे…वाटले आज थोडी उशिरा जरी पण वेळेपूर्वी आणि अभ्यास करून लिहिलेली रचना सार्थकी लागली,फलीत झाले.एक दीड तासांनी तर चक्क दादांचा फोन संदेश…. ‘तुमचा फोटो पाठवा’. मग तर काय.., आकाश ही ठेंगणे वाटू लागले. आणि प्रतीक्षा उरली ती फक्त सर्वोत्कृष्ट पोस्टरची. आपली ‘निसर्ग वाटाड्या’ हिच रचना उद्या झळकणार.तसे तर दुसऱ्याही काव्य प्रकारात लिहिले होते.
पण मनोमन अपेक्षा हीची होती. आणि झालेही तसेच..सकाळी ठीक८:२५ वाजता कविता समूहात सर्वोत्कृष्ट रचनेचे पोस्टर झळकले आणि पाहतो तर काय..,वरचा पाऊस विसावला असला तरी अभिनंदनीय शुभेच्छांचा वर्षाव मात्र जोरात सुरु झाला. काल दिवसभर त्यात चिंब चिंब भिजून न्हाऊन निघालो. आपली सर्वांची कौतुकरुपी थाप,प्रेरणाच लिखाणाचे बळ देते. आणि आनंद द्विगुणित करते.माझ्यासारखीच सर्वांचीच गत होते. यात काही दुमत नाही. शिलेदार समुहातील सर्वचजण
उत्कृष्ट लिहितात. काही महिन्यापूर्वी समूहात सामील झालेले आदरणिय बालाजी राजुरकर सर उत्कृष्ट लिहितात.तानाजी भोसले सर तसेच तेलंग सर, सुरेखाताई चित्ते, वनिताताई गभने, आमचे मित्र साजेस जी मगरे, सर्वांची नावे घेणे शक्य नाही.त्याबद्द्ल दिलगिरी.इथे प्रत्येकाच्या लेखणीचा यथोचित सन्मान केल्या जातो. आपण सर्वजण खूप भाग्यशाली आहोत. त्यातीलच मी एक. याचा मला सार्थ अभिमान आहे.
मागील स्पर्धा सप्ताहात देखील ९ जून रोजी सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेत ‘आम्ही वरवरचे’ या त्रिवेणी रचनेस सर्वोत्कृष्ट रचनेत द्वितीय स्थान देऊन सन्मानित केले. तसेच शुक्रवारिय हायकू काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट रचनेत स्थान देऊन व शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेत ‘क्षणभंगुर’ या रचनेला सर्वोत्कृष्ट रचनेत प्रथम स्थान देऊन सन्मानित करण्यात आले आहे. खूपदा ईच्छा असूनही वेळेअभावी व्यक्त होता येत नाही. म्हणून आज मागील रचनांचा उल्लेख करून, समुहाप्रती कृतज्ञता व्यक्त होणे माझे आद्य परम कर्तव्य समजतो. लांबत गेलेले पान्हाळ आखुडते घेतो.आणि ज्यांच्या कृपाशीर्वादाने साहित्य विश्वात मी व माझ्यासारखे असंख्य कवी , लेखक, साहित्यिक घडत आहेत,आणखी घडणार आहेत.तयाप्रती कृतज्ञतेची शब्दसुमने.
शिलेदार समूहाचे आधारवड, कल्पवृक्ष, सर्वेसर्वा, मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, संस्थेच्या सचिव आदरणीय पल्लवी ताई, मुख्य परीक्षक सविताताई पाटील ठाकरे,आ.तारकाताई रुखमोडे, आ. स्वातीताई मराडे, प्रतीमाताई नंदेश्वर , शर्मिलाताई देशमुख घुमरे, आ.वृंदाताई करमरकर, आ.विष्णू दादा संकपाळ सर, संग्राम दादा कुमठेकर सर,हंसराजदादा खोब्रागडे सर, अशोकजी लांडगे सर, आ. अरविंद उरकुडे सर सह सर्व सहप्रशासक,परीक्षक,सहपरीक्षक, संकलक आपणा सर्वांचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद. तसेच समुहातील सर्व ताई,दादा आपण सर्वांनी अभिनंदनीय शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित केलात. त्याबाबत पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देऊन सदैव ऋणात राहणे पसंत करतो.
बी एस गायकवाड
पालम परभणी
सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



