Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशसाहित्यगंध

बालपण

महेश पुरसों काणकोणकर कालापूर बांध, तिसवाडी गोवा

0 4 8 2 9 0

बालपण

बालपण म्हणजे गोड गमतीचा सडा,
निर्मळ हास्याचा निरागस झरा,
खेळण्यात रमलेले ते दिवस अनोखे,
चिंतेच्या छायांना न ओळखणारे लोभस मोके.

कधी गोट्या, कधी लगोरी, कधी भातुकली,
सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ धम्माली,
आईच्या हाकेला “आलो” म्हणत पळणं,
आणि पुन्हा थोड्या वेळात खेळात हरवणं.

पावसात भिजणं, कागदी नाव सोडणं,
मित्रांच्या गर्दीत मनसोक्त धावणं,
पडून उठणं, पुन्हा पळायला लागणं,
हेच तर होतं आनंदानं जगणं.

गोड गारठ्यात चुलीपाशी गप्पा मारणं,
आईच्या अंगाईनं स्वप्नात हरवणं,
बालपणाची हीच खरी जादू,
जी आयुष्यभर मनाला देते उभारी सादू.

बालपण म्हणजे सोन्याचा खजिना,
जगण्याला शिकवतो आनंदाचा दिवा,
त्या आठवणींच्या पंखांवर आपण उडतो,
आणि जीवनभर त्याच गोडीत न्हातो.

महेश पुरसों काणकोणकर
कालापूर बांध, तिसवाडी गोवा
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे