शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*☄विषय : अंधारयात्री☄*
*🍂शनिवार : ३१/ मे /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अंधारयात्री*
काळाकुट्ट अंधार दाटलेला
सभोवताली जरी पसरला
चालत रहायचं पाऊल पुढे
मार्ग नाही अजून विसरला
तमा नसे मज काळोखाची
तयारी काळोख भेदण्याची
आशेची नवी किरणे समोर
तयारी करतील स्वागताची
भीती कसली मनात आता
प्रवाशीच आहे अंधारयात्री
उगवेल पहाट मज स्वप्नांची
बाळगून आहे मनात खात्री
कटू गोड आठवणी सोबत
नाही उगा चघळत बसणार
अडचणींवर उपाय योजना
स्व कर्तुत्वाने मी आखणार
अपेक्षित मिळविल जिद्दीने
मात करील पण संकटावर
काळोखी रात्र संपून जाते
ती थोडी मालमत्ता स्थावर
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधाऱयात्री*
अज्ञानाला दूर सारणारी
ज्ञानज्योती माय सावित्री
नारीजातीस उध्दारायला
क्रांतीज्योती अंधाऱयात्री…
अज्ञानाचा कुट्ट काळोख
पुस्तक पाटी घेऊन हाती
तिच्या पदस्पर्शाने झाली
पावन महाराष्ट्राची माती…
निंदा थुंकी शेण गोळेही
गिळला अपमान नित्य
तिच्या संघर्षातून आज
स्त्रीशिक्षणाचं फळ सत्य…
सर्व मुलींना शिकवा
हा एकच तिचा ध्यास
शिक्षणाचा मंत्र झाला
सावित्रीबाईचा श्वास…
अंधाऱयात्री सावित्रीबाई
ज्ञानज्योती ठरली खरी
म्हणूनच देशाच्या सर्वोच्च
पदस्थानी विराजित नारी…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
अंधारयात्री होता बाबासाहेब भीमराव।
तुझ्यामुळेच उजळले , येथील गावोगाव।।
लाख डोळ्यातील अश्रूंना,पुसून काढीले।
वंचितांना सन्मानाचे , जीवन प्रदान केले।।
पिढ्यापिढ्याचा अंधार रे, पळून गेला दूर।
या भारतात जन्माला, भारताचा कोहिनूर।।
माणसास माणसापरी ,जगणे होते कठीण।
पशुसम जगत होते सारे दलित हिनदीन।।
अनिष्ट रुढी परंपरा ,विरुद्ध करून क्रांती।
समाजात चेतवूनी ज्ञान, विज्ञानाच्या ज्योती ।।
देह झिजविला समाजासाठी ,चंदनासमान।
परीश्रमाने लिहून दिले,भारताला संविधान।।
विश्वशांती नांदावया, शरण बुध्दाला गेला।
प्रज्ञावंत कबीर शिवबा ज्योतीबांचा चेला।।
युगप्रवर्तक प्रज्ञासूर्य,झाला नव्या युगाचा।
आदर्श घेऊ आता , चला रे भीम विचारांचा।।
*गोवर्धन् तेलंग*
*पांढरकवडा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
कुणी मशाल दिली हाती
तरीही मनास नसे खात्री
आता दुरावलाय उजेड
अन् झाले मी अंधारयात्री.. //
हा सूर्यही जणू शत्रू वाटे
गूढ तिमिराशी गाढ मैत्री
कर्णबधिर समजावे मला
गर्द काजळरात दाटे नेत्री.. //
लिहिणे वाचणे बरेच तरी
ते सारे काही कागदोपत्री
मेंदू तर नुसता नामधारी
कांही उरले नसे एकसूत्री…//
तूझ्या रूपाने हरवलीय
माथ्यावरची प्रित छत्री
अन् नियतीच्या हातीची
बनलेय जणू कळसूत्री.. //
तुझ्या आठवांचीच गर्दी
आसवात ओल्या रात्री
अकाली लावली काळाने
शृंगार सोहळ्यास कात्री.. //
जगायचेच आहे कसेही
तुझ्या अंशाची मी दात्री
उगाच कुणी समजू नये
मी घायाळ हरिणी भित्री…//
अर्ध्यावरती साथ सोडून
तू झाला अनंताचा यात्री
तुझ्या विरहाग्नीत जळते
कण कण कोमल गात्री.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अंधारयात्री*
तू तळपतोस दिनभर..
रवी प्रखर तेजाने…
प्रकाशवाटा खुल्या करतोस
जरी सढळ हाताने…
तुझ्या तेजोमय प्रकाशाने
सर्वांच्याच आयुष्यातला..
अंधार दूर नाही ..
मैफिलीत जीवनाच्या..
कसा त्यांच्या सूर नाही …
बेरंग जिंदगीत रंग त्यांनी
कुठला भरावा?
हसूनी आयुष्याचा मुक्त छंद
कसा लिहावा…?
संघर्ष पेरलेला आहे भाळी
सदैव त्यांच्या
नित बरसतात तेथे या गारा
आसवांच्या…
घास उगाच अडतो ज्यांचे
सदैव ओठी…
नसे कोणती छत्रछाया
का रे त्यांच्या माथी? …
असंख्य तेजकिरणे दिमाखात
मिरवणाऱ्या भास्करा…
अजूनही चाचपडणाऱ्या कैक अंधारयात्रीपर्यंत …
कधी पोहचतील तुझ्या प्रकाशवाटा…?
अंधारात ही त्यांनी कसे
स्वयंप्रकाशित व्हावे?
की प्रतिक्षेत सदा तुझ्या
“अंधारयात्री” म्हणूनच जगावे?
*सौ.सारिका मोरे*
*वाई,सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
तमात पेटली दिव्य ज्योती
उजाळल्या अंधार रात्री
हजारो सुर्याचे तेज लेवूनी
समाज प्रकाशी अंधारयात्री
तमा न कसली स्वरक्षणाची
पावन करण्या पवित्र माती
दिनरात झोकून जनसेवेच्या
यज्ञकूंडात जीवनाची आहूती
हरवलेली वाट दाखवून
लोपले सुर्य पण प्रकाश तेवत
मार्गक्रमण करीत लक्ष गाठूया
त्यांच्या पावलावर पाऊले टाकत
स्मरण तयांचे सदोदित व्हावे
उत्सवा पुरती नको तमाशा
कत्तृत्वाचा परिमळ भिनवू अंगी
जगाचा आदर्श बनवू भारत देशा
*श्री अरविंद उरकुडे, गडचिरोली*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
तो न बोलता जगतो, न रडता सहन करतो,
दोन घास कमी खाऊन, आपल्यासाठी श्रम करतो।
सावलीसारखा असतो, पण कुणी त्याचं अस्तित्व ओळखत नाही,
कारण तो अंधारयात्री असतो – पण कधीच थकलेला नाही।
कधी अंगावर कर्जाचं ओझं, कधी स्वप्नांचं दडपण,
तरीही नजरेत नसे खंत, फक्त मुलांच्या भविष्याचं चिंतन।
काठी नसली तरी खंबीर असतो,
थकवा पिऊनही निर्धाराने उभा असतो।
तो न मागतो कौतुक, न शोधतो टाळ्या,
फक्त बघतो – आपण सुखात आहोत का ह्याच्या खुणा।
हातातील घट्टसावळं मळलेलं ते घड्याळ,
तेच सांगतं – त्याचा वेळ आपल्यासाठीच वापरलेला काळ।
कधी आपल्या मागे उभा, कधी पुढे ढाल बनून,
तो हर एक अंधार स्वतः झेलतो, आपल्याला उजेडात ठेऊन।
कधी शब्दांत नाही दाखवू शकत त्याचं प्रेम,
पण तोच आपला बाप – तो असल्याने जगात सर्व काही क्षेम ।
तो अंधारयात्री – कारण त्यानं अंधारात चालून,
आपल्यासाठी दिवा लावला – त्याच्या पायाच्या आहुतीनं।
*सौ.मोनाली शिंदाडे*
*कर्वेनगर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
कितीतरी वैष्णवी अंधारयात्री
बनून जीवन जगत आहेत,
घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक
राक्षस बनून छळत आहेत.
छळाला कंटाळून अंधारयात्री
कित्येक जीवन संपवत आहेत,
या क्रूर अन् लोभी लोकांना
आपलेच अभय देत आहेत.
कधी बदलेल ही मानसिकता?
मुलींविषयीची ही अनास्था?
का जन्म घेतला मनुष्यपोटी,
जनावरांनाही असते आस्था!
अनेक लेकी अंधारयात्री असतात,
मरण येत नाही म्हणून जगतात.
न दाखवित दुःख मातापित्यांना,
खोटं हसणं त्यांना दाखवतात.
शिक्षा द्यावी अत्याचार्यांना अशी,
की न करेल पुन्हा कोणी चूक कधी.
फासावर लटकवावं अशांनाही,
दाखवून लोकांच्या समूहामधुनी.
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट, वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
माझ्याच स्पंदनाचा यौवनात किती हा ताप आहे
सातच्या आत घरात कोणते हे माप आहे
आकाशात घेतली भरारी तरी का कुचंबणा
अजुनही आईबाप करती का मुलासाठीच जाप आहे
फक्त भाषणातून देती हक्क बरोबरीचा
आई एकट्यात बोलली हा जन्म श्राप आहे
पत्नी, बहीण कधी बनून रणरागीणी
एकाच रुपात पेलते किती हा व्याप आहे
अंधारयात्री मी, बसली इथे कैक गिधाडे
मुक्तसंचार करने इथे वाटते पाप आहे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
*अंधारयात्री*
अंधारयात्री होते मी या जीवनात
सद्गुरू तुम्ही सूर्य बनून आले..
प्रारब्धाच्या नैराश्याला दूर करीत
अंधारले आयुष्य प्रकाशित केले..//
म्हणतात की हा मानव जन्म
चौऱ्यांशीचा फेरा टाळून मिळतो..
परी तोच जन्म नकोसा वाटे
इतके का परमेश्वर छळतो..//
पापपुण्य जन्मोजन्मींचे सारे
भोगण्यास हा मानव देह निवडला..
एकही कर्म देवा तुला माझा
कसा नसेल रे ना आवडला.//
तूच दिलेल्या श्वासांचे इतके का
ओझे वाटू लागले होते मजला..
आकांत समजण्या माझा लागलीत
कितीतरी माझे बहुमूल्य वर्ष तुजला..//
अंधारयात्री जीवन झाले होते
कुठूनही दिसेना मज प्रकाश..
तरीही वाटतसे उचलून
कवेत घेईल आकाश..//
चाचपडणाऱ्या माझ्या अवस्थेची
अखेर तुला किंचित आली दया..
सद्गुरूच्या माध्यमाने येऊन
केलीस सकारात्मक जादूची माया..//
दूर करून नैराश्य ह्या जन्मीचे
तेजोमय प्रकाश आला जीवनात..
प्रत्येक श्वास माझा गुरुदेवा
आता जगणे तुझ्या आत्मबंधनात..//
आता जगणे तुझ्या आत्मबंधनात..//
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🌒💥🌒➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



