कालबाह्य झालेली बालपणातील ‘चमन गोटी’ ; शर्मिला देशमुख
मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण
कालबाह्य झालेली बालपणातील ‘चमन गोटी’ ; शर्मिला देशमुख
मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे परीक्षण
‘चमन गोटा, लाल टमाटा,सकाळी उठून, पेढे वाटा’ ही बालपणीची चमन केलेल्या मुलांना चिडवण्यासाठी वापरावयाची चीड होती. साधा फुगा जरी फुटला तरी त्याची पण नंतर चमन गोटी बनवून डोक्यावर फोडत होतो. कारण निशु:ल्क मज्जाच मजा, देण्या घेण्याचे एकमेव तंत्र ‘चमन गोटी’ होते. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या की आजही फुटलेला फुगा आठवतो. नंतर त्या फुग्याचे फाटलेले अवयव एकत्र करून त्यास जीवनदान देणे अर्थात त्याची ‘चमन गोटी’ करून एखाद्याच्या डोक्यावर फोडून आनंद साजरा करणे.
लहानपणी आईवडील केसाची वाढ लवकर व्हावी म्हणून मुलांची चंपी करायचे. तर वात्रट मुले मग त्याला ‘चंपी गोटा लाल टमाटा’ म्हणून चिडवायचे तर काहीजण त्याच्या डोक्यावर टिकली टिकली, टिंग टिंग करून मारून जायचे. कोणी मटक्यावर ढोल वाजवल्याप्रमाणे डोक्यावर वाजवायचे. मुलगा धाडसी असेल तर या गोष्टींना तोंड द्यायचा नाही तर घरी रडतच यायचा. हा मुलांचा छपरीपणा कदाचित निसर्गालाही भावला नसावा. आता लवकरच निसर्गतःच ‘चमन’ निर्माण होऊ लागले. एका अहवालानुसार तर 2050 नंतरची मुले जन्मताच चमन गोटी जन्मतील. मग तर कोणी कोणाला चिडवायचे हा एक मोठा प्रश्नच आहे.
निसर्गाला जपले तर निसर्ग तुम्हाला नक्कीच जपेल! निसर्गाची जपणूक, संवर्धन करून नैसर्गिक गोष्टींचा वापर केला तर कदाचित पूर्वीच्या काळी माणसांच्या डोक्यावर केस होते आणि शेपटी प्रमाणे तेही हळूहळू गळून गेले व चमनगोटी झाली. हे इतिहासात शिकवण्याची वेळ येऊ नये, बस इतकेच! आज ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा’ विषय चमनगोटी हा होता. वैचारिक पातळीवर नेहमीच मंथन करायला लावणारे सखोल गर्भितार्थ असणारे विषय द्यायला राहुल दादांना नेहमीच आवडते. वरवर हास्याचा असणारा हा विषय खूप गंभीर पण आहे. असो आज समूहामध्ये चमनगोटी याचा ज्याला जसा अर्थ वाटला तसे त्याने लिखाण केले व वैविध्यपूर्ण लिखाण झाले. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल त्यांचे शतशः ऋण .धन्यवाद….!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक/ कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



