0
4
8
2
9
4
तो एक गाफील क्षण असा
तो एक गाफील क्षण असा
जीवाला घोर लावून गेला
राहिले न मी माझी बापडी
तो मन माझे व्यापून गेला
अचंबित मन माझे झाले
कुणा ठाऊक कोठूनी आला
जुन्या आठवणींचा पेटारा
मजसमोर खोलून गेला
करावे हितगुज त्याच्याशी
मनानेही होता कौल दिला
परतण्याचा करून वादा
तो न बोलता निघून गेला
म्हणून सांगते ठेवा ध्यानी
विचार माझा मौलिक मनी
जशी निसटे रेती हातून
जाईल निघून हाही क्षण
बी. आर. पतंगे
जि अहिल्यानगर
0
4
8
2
9
4



