Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

गौरी आल्या अंगणी

प्रा.दिनकर झाडे

0 4 8 2 9 4

गौरी आल्या अंगणी

ढोल ताशांच्या गजरी
गौरी आल्या ग अंगणी
त्यांच्या स्वागतासाठी
गुलाल उधळे गगनी

रांगोळीची उधळण
हळदी कुंकवाचा सडा
नाजूक हास्याने गौरीच्या
गेला खुलुनिया वाडा

दुःख बाजूला सारत
सुख समृद्धी घेऊन
गौरी आल्या ग अंगणी
साज श्रृंगार लावून

भरतात सुहासिनी
खनानारळाचीं ओटी
झिम्मा फुगडी खेळती
पदर खोचूनिया पोटी

दोन दिवसां करिता
येती माहेरवाशिणी
पूजा अर्चा करुनिया
देवू निरोप हर्षूनी

प्रा.दिनकर झाडे
गडचांदूर, जि. चंद्रपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे