Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

क्रांतीज्योती विद्यालय (मराठी माध्यम): शाळा, संस्कार आणि आशेची कहाणी

अनिता व्यवहारे सेवानिवृत्त शिक्षिका ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

0 4 8 3 0 2

क्रांतीज्योती विद्यालय (मराठी माध्यम): शाळा, संस्कार आणि आशेची कहाणी

क्रांतीज्योती विद्यालय (मराठी माध्यम) हा चित्रपट फक्त कथा सांगत नाही; तो मराठी शाळेच्या आठवणी, संस्कार आणि आशेचा दस्तऐवज आहे. सध्या सर्वत्र गाजणारे “शाळा मराठी… आमची शाळा मराठी वं…” हे गीत ऐकले की, प्रत्येकाच्या मनात मराठी शाळेचा अभिमान आणि ओढ जागृत होते. चित्रपटात घटती विद्यार्थी संख्या, इंग्रजी माध्यमाकडे झुकणारा ओढ आणि मराठी शिक्षणावर येणारे प्रश्नचिन्ह स्पष्टपणे मांडले आहेत. परंतु त्याचवेळी, शिक्षकांचे निस्सीम समर्पण, वर्गखोल्यांतील संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतले स्वप्नही तितक्याच ताकदीने उभे राहतात.

माझ्या शाळेतील अनुभव आठवतो एक हुशार पण शांत विद्यार्थी, ज्याला इंग्रजी माध्यमात टाकण्याचा विचार होता, म्हणाला, “मॅडम, मला मराठीतच शिकायला आवडतं. इथे मला सगळं समजतं, तुमच्या सारखे शिक्षक दुसरीकडे नाही मिळणार.” त्याने पुढे शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवले. अशा अनुभवातून स्पष्ट होते की योग्य मार्गदर्शन आणि संस्कार देणारी शाळा विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व घडवते.

“स्वर्गात आकाशगंगा… शाळेत लाविला कल्पतरू, फांद्या शंभर…, फुले फुलती नक्षत्रांची, झाला आनंद, आली बहार…” या ओळींमध्ये शाळा फक्त इमारत नसून संस्कारांची बाग आहे, शिक्षक त्या बागेचे माळी आहेत. काळाच्या ओघात फांद्या फुटतात, विचार विस्तारतात आणि समाजासाठी उपयुक्त पिढी घडते. चित्रपटाच्या लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माती क्षितिजा जोग आणि सर्व कलाकारांचे मनापासून आभार. त्यांनी मराठी शाळेच्या प्रश्नाला फक्त मांडले नाही, तर आशेचा दीपही पेटवला आहे.

क्रांतीज्योती विद्यालय आपल्याला विचार करायला लावतो आपली भाषा, आपली शाळा आणि संस्कार आपण किती जपतो? “आमची शाळा मराठी वं” हा फक्त नारा नाही, तर आपली ओळख, अभिमान आणि भविष्य घडवणारा संदेश आहे.

अनिता व्यवहारे
सेवानिवृत्त शिक्षिका
ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर
====÷====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे