Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

अंतरीचा उजेड

उर्मिला राऊत फ्रेंड्स कॉलनी नागपूर

0 4 8 2 9 0

अंतरीचा उजेड

थकलेल्या मनाला स्वतःच औषध,
जे न बोलता सांगतं
“उठ, अजून संपलं नाही काही.”
धैर्य वेदनेच्या मुळाशीच उगवतं//१//
कधी आयुष्य इतकं तुटतं
आवाजही भरकटून जातो,
पण त्याच शांततेत स्वतःचा
खरा सूर अवश्य सापडतो//२//
लोक मध्येच सोडून गेले तरी
स्वतःचा हात स्वतःलाच धरावा लागतो,
आणि तिथेच घडतो खरा माणूस
चुका, वेदना, जिद्द यांनी तो घडतो //३//
प्रत्येक क्षण त्याला सांगतो—
“तू एकटा नाहीस, हे लक्षात ठेव,”
दु:खच जीवनाला देती नवं पान।
मनातला चांगुलपणा हाच खरा देव//४//
समोरच्याचं दु:ख ऐकण्यातच अर्धा उपाय,
हात धरून चालणं हेच सर्वात मोठं देणं।
मानवतेच्या उबदार शब्दांनी विझते भय,
तिथेच उमलतं मनाशी मनाचं जोडणं//५//

उर्मिला राऊत
फ्रेंड्स कॉलनी नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे