0
4
8
3
0
2
आत्मशक्ती
समजू नको स्वतःला
तू कदापीही कमजोर
अन्यथा इथे तुझ्यावर
होईल दुनिया शिरजोर.. //
सिद्ध हवे लढण्यास
आधी मन, मग शरीर
हार किंवा जीत नंतर
कधीच सोडू नये धीर.. //
अवसान गाळून कधी
व्हायचे नाही निरूत्तर
नजरेत घालून नजर
द्यावे संकटाला उत्तर…//
तूच तुझा शिल्पकार
आत्मशक्ती जागृत कर
परावलंबित्व झुगारून
वेळीच बन आत्मनिर्भर.. //
झुंडीने यावे तुझ्या मागे
अशी मळव नवी वाट
चालत रहा विश्वासाने
येईल समोर रम्य पहाट… //
विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
0
4
8
3
0
2



