एक अविस्मरणीय दिवस
सिंधू बनसोडे, इंदापूर पुणे
एक अविस्मरणीय दिवस
जे जे असे पिंडी,ते असे ब्रह्मांडी
ओढ ती निघाली, साहित्यिकांची दिंडी
मराठी साहित्यिकांच्या वैष्णव मेळाव्यात राग, लोभ, मत्सर, स्वार्थ कुठेच दिसला नाही. राजकारण सुद्धा नाही. दिसला तो विचारवंत वैष्णवांचा मेळावा..!! भगवंत स्वरूप देव प्रचितीच आली. सर्व गुरुमाऊली, गुरुवर्या, कविवर्या यांना पाहून..!! समुद्राचा तळ.. निसर्गाचे चमत्कार… नात्यांची जादुई.. कल्पनांचा शृंगार… वास्तव आणि जाणिवेची निवड… मनातले मोरपीस .. आणि नुसता चेहरा पाहून पानभर लिखाण करणारे…कवीवर्य.. या वैष्णव मेळाव्यात प्रत्यक्ष पाहण्याचे आणि त्यांचे दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले.
अगदी वेळेनुसार कार्यक्रमाचे नियोजन. सर्वांचेच आगत स्वागत बैठक व्यवस्था अतिशय उत्तम. मराठीचे शिलेदार समूहाचे सहप्रशासक उत्तमरीत्या एक एक कामगिरीचं नेतृत्व करत होते. वाह.. जिजाऊ माता शोभत्या करा. सवितामाय.. अस्खलित संस्कृत आणि मराठीचा गौरव आपणाकडून ऐकावा .. ब्युटी विथ ब्रेन.. प्रत्यक्ष अनुभवला आपल्यातला.. आणि तितकीच आपल्याला खंबीरपणे साथ देणारे प्रशांत दादा..नमन आपणास. कार्यक्रमाची घडी बसविणारे आपण.. शब्दप्रभू…प्रत्येक गोष्टीत विनोदाने भरलेले व्यक्तिमत्व.. साक्षात विष्णू देवच अवतरले व्यासपीठावर.. आपल्या प्रांजळ वाणीने.. सत्काराचे उत्तम कार्यभाग करत होते.
आकाशातला शुक्रतारा जसा चमकावा.. तशा तारकामाय… मध्येच आपलं अस्तित्वाचे पूर्णत्व दाखवत होत्या. सौंदर्यवती शर्मिलाताई… भारदस्त अस्तित्व साकारत होत्या. हळव्या..अत्यंत करुणामय …शांतीदूत असणारे अशोकदादा. झिलाणचे निर्माता अरविंद दादा…व्यासपीठाची धुरा सांभाळत होते. माझी मिठाश्री..स्वाती ताई…तिच्यापुढे निसर्गाचे सारे नक्षत्र नम्र झाले असे वाटत होते.. विचारांच्या जाणिवा..त्यातले ममत्व असणाऱ्या समुद्राच्या तळ शोधणाऱ्या डॉ. पद्मा जाधव ह्यांना प्रथमच पाहून मी अंतर्मुख झाले.
आ. आमदार विक्रम दादा ह्यांचे भाषण म्हणजे… सर्व मराठीच्या शिलेदारांना प्रेरणा. तुफानी अखिल पठाण दादा…तडफदार भाषण झाले. कीर्तनकार दादांनी.. नवनवीन साहित्यप्रकार लिहायला घ्या.. तुमच्यातली प्रतिभा उंचवा… प्रवासाचे वर्णन.. हा नवीन साहित्यप्रकार लिहा.. सगळ्यांची भाषणे अगदी उच्चतम पातळीची होती.
उत्सुकता अधीरता.. झाली पुस्तकांची प्रकाशन सुरुवात. अगदी नाम डौलात.. प्रत्येक मराठी शिलेदारांचं पुस्तक अगदी झोकात सर्व पाहुण्यांच्या हस्ते आणि मराठी शिलेदारांच्या साक्षीने झाले. हाच तो प्रत्येक कुटुंबाचा अमृत सोहळा असं मला वाटतं. मध्यांतरानंतर मिळाला तो जेवणाचा आस्वाद. लेकी आणि जावई येणार म्हणून ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे पिताश्री राहुल दादांनी सोय उत्तम लावून दिली होती. जसा पुस्तक प्रकाशन सोहळा… तसाच जेवणाचा सोहळा होता. प्रत्येक कवी मनाने अन्नदाता सुखी भव! भरभरून आशीर्वाद दिला.
एवढ्या मोठ्या व्यासपीठावर…. मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल दादासाहेब.. व्यासपीठावर विराजमान झाले तेव्हा थंड हवेची झुळूक आली आणि प्रत्येक कवी मनाला थंडगार गारवा देऊन गेली. नांदून आलेल्या लेकीला आपल्या बापाचं दर्शन घेतल्यावर कृतकृत्य वाटतं तसं काही फिल झालं. मला भगवंत स्वरूप पिताश्रीच वाटले. पुढील कार्यक्रमाला रंगत आणि संगतच आली. झाली ती चालू काव्यस्पर्धा. अशा या गोड कार्यक्रमानंतर.. सुरू झाला तो बक्षीस वितरण.. हा सर्व कौतुकसोहळा अनुभवत असताना.. न भूतो न भविष्यती! अचानक या पामराचं नाव.. प्रथम क्रमांकाने घोषित..!! अत्यंत आनंदाने भारावून जावं… आनंदाश्रू डोळ्यातून यावं..आणि तेच अश्रू… प्रेरणा देणाऱ्या… मार्गदर्शन करणाऱ्या.. दिशा देणाऱ्या.. श्री सखीच्या.. श्री मीठाश्रीच्या चरणी वाहावं… यापेक्षा वेगळा आनंद माझ्या तर आयुष्यात नाही. धन्यवाद! मराठीचे शिलेदार समूहाचे.
आता खरच मला वाटते, मी सुद्धा भाग्यवान..
मनाच्या श्रीमंतीची माणसं, नेहमीच मला करतील सज्ञान!!
सिंधू बनसोडे, इंदापूर पुणे
कवयित्री,लेखिका, शिक्षिका
=====



