‘रद्दी’ वह्या पुस्तकांची…!!
वसुधा वैभव नाईक धनकवडी जिल्हा पुणे
‘रद्दी’ वह्या पुस्तकांची…!!
आपण लहानपणापासून वहीवर लिहितो. पुस्तकांचाही वापर करतो. वहीमध्ये सुबक अक्षर कसं काढायचं हे शिकतो. प्रथम दुरेघीमध्ये नंतर एक रेघीमध्ये, चौकटी वहीमध्ये नंतर फुल स्केप वहीमध्ये आता काय तर वह्यांची इतके नमुने आलेले आहेत की प्रत्येक वही नव्याने आपल्याला पाहायला मिळते. वहीचे अट्रॅक्शन वाढत जाते. पण वहीची पानं संपली की वही रद्दी होते. पण आपण त्या रद्दी झालेल्या वहीचा कधी विचार केलाय का हो! त्यावेळी वहीमध्ये आपण काय काय लिहिलेल आहे? त्यावेळी वहीने आपल्याला किमान महिना, दोन महिना साथ दिलेली असते. त्यामध्ये आपण अक्षर चांगले काढण्याचा प्रयत्न केलेला असतो.
पाठ्यपुस्तकातील पाठाचे प्रश्न उत्तर आणि आणखी विविध उपक्रम लिहिलेले असतात. मग ही वही रद्दी कशी होईल? या वहीतलं जे आवश्यक आहे ते आपण कात्रण कापून ठेवावे, किंवा आपण पुढच्या वर्गात गेल्यानंतर मागच्या वर्गातील मुलांना ती वही उपयोगाला येणार असेल तर ती आपण जपून ठेवावी आणि त्यांच्याकडे ती सुपूर्द करावी. काही मुलांचे अक्षर खूपच खराब असतात त्यावेळेला ती वही तुम्ही रद्दी म्हणून दिली तरी चालेल. पण ज्या मुलांची अक्षर छान आहेत वळणदार आहेत त्या वह्या इतर मुलांच्या उपयोगाला येऊ शकतात.
पुस्तकांचं म्हणाल तर, पुस्तकातले चित्रे आपल्याला अनेक ठिकाणी उपयोग करता येतो. आपल्याला आपले शिक्षक उपक्रमाच्या माध्यमातून विविध विषय हाताळायला देतात. त्यावेळी ह्या उपक्रमांसाठी आपल्याला चित्रांची गरज असते व चित्र विकत घेण्यापेक्षा ह्या पुस्तकातील चित्र कापून त्यामध्ये लावायची त्यामुळे आपल्या पुस्तकाची रद्दी म्हणण्यापेक्षा त्याचा आपल्याला उपयोग करता येतो आणि आपल्याला त्याचा आनंद घेऊन त्या पुस्तकाचा उपयोग करून घेता येतो. नवीन अभ्यासक्रम निघतो त्याला जुन्या अभ्यासक्रमांचा काही अंशी नवीन पुस्तकांमध्ये देखील परत उपयोग केलेला असतो. अशा वेळेला त्या जुन्या पुस्तकांचा उपयोग नवीन विद्यार्थ्यांना होऊ शकतो. काही पुस्तक बाजारात उपलब्ध नसतात अशा वेळेला ह्या जुन्या पुस्तकांचा आधार खूप मोलाचा वाटतो. पुस्तक आपल्याला ज्ञान देतात ते कधीच रद्दी होत नाहीत. ” वाचाल तर वाचाल” या उक्ती प्रमाणे तुम्ही जेवढं वाचन कराल, तेवढे आपल्यामध्ये ज्ञानवृद्धी होत राहते. त्यामुळे पुस्तके पण रद्दीत देताना जरा विचार करावा त्यातली कात्रण कापून ठेवावीत.
आपल्या प्रत्येकाकडे सकाळ हे वर्तमानपत्र तर येतेच येते. परंतु सकाळ बरोबर अनेकांकडे लोकमत, लोकसत्ता, केसरी, प्रभात, म. टाइम्स अशी सुद्धा वर्तमानपत्रे येतात. वर्तमानपत्रातले लेखन त्यादिवशी सगळीकडे सारखे असते. परंतु काही असे विषय हाताळले असतात ही सकाळमध्ये जे नाही ते केसरीमध्ये असतं, केसरीमध्ये जे नाही ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये असतं. अशा वेळेला शैक्षणिक दृष्ट्या जे काही आपल्याला उपयोगाचा आहे यातली कात्रणाकडून एक छान वहीमध्ये जुन्याच वहीमध्ये लावा तुम्ही तिथे तुम्ही त्याचा वापर त्या वहीचा केलेला आहे आणि मग त्यावेळी मध्ये हे चिटकवा आपल्याला ते वर्षानुवर्ष छान टिकून राहतं आणि पुन्हा पुन्हा नव्याने त्याचा अभ्यास करता येतो.
याच्यामध्ये मग पूर्वी बोधकथा यायच्या. त्या बोधकथा सगळ्या कात्रण करून आपण चिटकवलीत एका वहीमध्ये तर आपल्या मुलाबाळांना पुढच्या पिढीला त्याचा उपयोग छान होतो किंबहुना आपण शिक्षके पैशांमध्ये असाल किंवा नसाल तरी सुद्धा आपल्याला समोरच्या लहान मुलांना बोधकथा सांगण्यासाठी त्याचा खूप उपयोग झालेला आहे आणि होत आहे. वैज्ञानिकांची माहिती येते, मूल्य संस्कारनांवर कथा असतात, आता सध्या लोकसत्ता मध्ये’ माझे गुरु’ या विषयावर लेख येत आहे. ते पण खूप वाचनीय आहेत आपल्या ज्ञानात त्याने भर पडते. या लेखांवर आधारित प्रश्नमाला येत आहे. त्यामुळे मुलं ते वाचतात आणि मुलांच्या ज्ञानातही आपोआप भर पडते.
एक किस्सा सांगते माझ्याच घरी घडलेला माझ्या वडिलांना दररोज पाच ते सहा पेपर घ्यायची सवय होती. रोज पाच, सहा पेपर म्हटले की दररोजचीच आमची रद्दी खूप असायची. वडील माझे अगदी खूप पूर्वीपासून त्यातली कात्रण काढून ठेवणार,लेख लिहिणार पत्रकारांना बातम्या पोहोचवणार. त्यामुळे त्यांचा सकाळ, स्वराज्य आणि लोकसत्ता मध्ये जरा वर्चस्व होतं म्हटलं तरी चालेल. पणे पाच, सहा पेपर म्हटलं की महिनाभराचे रद्दी आमची खूप असायची. पण वडील काय रद्दी द्यायला तयार नसायचे.आमच्या घरात पेपरची थप्पी साठायची. घरातले सर्वजण त्यांना बोलायचे काय दादा काय करताय तुम्ही? तुमच्या रद्दीमुळे घरात इतर वस्तूंना जागा नाहीये. त्यावेळी माझे वडील म्हणायचे ” मी आहे तोपर्यंत ही रद्दी नाही. हा माझा संसार आहे. मला कोणीही बोलायचं नाही. मला ज्यावेळी वाटेल तेंव्हा कात्रणं काढून मी ती रद्दी विकेन. आणि ज्यावेळी मला हे होणार नाही त्या वेळेला माझ्याबरोबर ही रद्दी माझ्या सरणावर टाकून द्या. ” अशा शब्दात ते घरातल्याना सुनवायाचे.
पूर्वीच्या लोकांचे ह्या पेपर वरती वर्तमानपत्रावरती खूप प्रेम होते. आता हल्ली आपल्याला हे बघायला मिळत नाही. महिनाभराची रद्दी साठली की आपण ताबडतोब विकून येतो. मला एक अशी सवय लागलेली आहे की त्यातली कात्रण काढायची जी मला आवश्यक आहे ते आणि मग रद्दी द्यायची. माझ्या वडिलांचे गुण माझ्यामध्ये आलेले आहेत. पूर्वी आपल्याकडे हिंदालियम, तांबे आणि पितळ होतं. पितळी वस्तूंना आपल्याला काल्हई लावून घ्यावी लागत होती. त्याशिवाय पितळेची भांडी वापरता येत नव्हती. आणि स्वस्त म्हणून हिंदालीयमची भांडी वापरायची. पण आज काळ उलटला आहे. आज मस्त डेकोरेटिव्ह भांडी मिळत आहेत. मग ही जुनी भांडी काय करायची?? या भांड्यांना रद्दीचे दुकान दाखवले जाते. येथे या वस्तूंना चांगली किंमत येते आणि आपण त्यामध्ये नवीन वस्तू घेऊ शकतो.
भांड्यांच्या दुकानांमध्ये आपल्याला हे विकता येते आणि आपण नवीन वस्तू त्यातून खरेदी करू शकतो. आत्ता पूर्वीच्या सारखे राहिलेले नाही कारण पूर्वी जरा बायका घरी असायच्या त्यामुळे भांडी स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करून ठेवायच्या. आता पितळ, तांबे आणि हिंदलियम घासायला वेळ मिळत नाही. आता पुरुषाबरोबर बायका सुद्धा घराच्या बाहेर पडल्या आहेत नोकरी करत आहेत. मग घरी एक मोलकरीण असते. तिच्या हाती घराची निगा सोपवली जाते. त्यामुळे तांबो पितळ आणि हिंदालियम दूर राहिल आहे आणि तिथे प्लास्टिकच्या बरण्यांनी प्रवेश केलेला आहे. स्टीलच्या वस्तू वापरण्यात येत आहेत. डेकोरेटिव्ह कडे कल वाढला आहे. घासायला जेवढं सोप्प त्याकडे कल वाढला गेला आहे. ये पटकन घासून पासून लख्ख होणाऱ्या वस्तू घरामध्ये आणल्या जात आहेत.
पण तरी देखील आजही तांबे पितळे हिंदालीयम नव्या स्वरूपात येत आहे आणि त्याला लोक एक्सेप्ट करत आहेत. तांब, पितळ यांच्या वापराने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे लोकांना हल्ली समजत आहे त्यामुळे पुन्हा काही डेकोरेटिव्ह वस्तू या माध्यमातून घरी आणण चालू आहे. म्हणजेच काय तर जुनं ते सोनं. हा अनुभव परत प्रत्ययास येत आहे. बघा आपण सिनेमाची गाणी बघताना आजची पिढी सुद्धा जुन्या जमान्यातील गाण्यांचा आस्वाद घेताना आपल्याला दिसतात. मी स्वतः दररोज रात्री एक तास जुन्या गाण्यांचे व्हिडिओ पाहते आणि माझे दिवसभराचे जे काही डोक्यातली किल्मिष असतील ते दूर करून मन शांत करते. अशी खूप उदाहरणे आपल्या घरातील रद्दीची देता येतील. तूर्तास एवढेच..!!
वसुधा वैभव नाईक
धनकवडी जिल्हा पुणे
=====



