आयुर्वेदिक वनस्पतीने नटलेले ‘संजीवनी बेट’
गणेश ज्ञानेश्वर माशाळकर, (ज्ञानज्योत)
आयुर्वेदिक वनस्पतीने नटलेले ‘संजीवनी बेट’
आम्ही सर्वांनी ‘संजीवनी बेट’ या ठिकाणी शैक्षणिक सहल म्हणून भेट दिली. लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यात वडवळ या गावी ते स्थायिक आहे. संजीवनी बेटाला वैज्ञानिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार लक्ष्मणाला बाण लागला व हनुमंत राय संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालयाकडे जाऊन येत होते. त्यावेळेस काही जडीबुटी त्या पर्वताच्या खाली जमिनीवर पडल्या. त्या ठिकाणाला ‘संजीवनी बेट’ असे नाव पडले. महाराष्ट्र , कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातून लोकांची संजीवनी बेटावर खूपच श्रद्धा आहे. सुमारे 27 नक्षत्रापैंकी 1 नक्षत्र उत्तरा नक्षत्रामध्ये तीन राज्यातून लोक येथे येऊन औषधी वनस्पतीचे सेवन करतात व शेवटी ते फक्त काळ्या साळीचा भात खातात. यामध्ये दुसरा काहीच आहार नसतो. संजीवनी बेटावर सापडणारी दुर्मिळ वनस्पती जसे की, निर्मळी फेकस मिलस, काबा, अफूमारी असे झाडे आहेत ते सोडून खूप दुर्मिळ वनस्पती त्या ठिकाणी मिळतात.
फक्त वनस्पतीच नाही तर, एक ‘मॅग्नेटिक फिल्ड’ आहे. त्या ठिकाणी जर आपण पोटावर झोपून लोटांगण घेतले, तर आपले शरीर आपणहून लोटांगण घ्यायला सुरू करते व शरीरावरील संतूलन निघून जाते. थोड्या वेळासाठी माणसाचे लोटांगण घेताना बुद्धीवरील नियंत्रण सुटते. डॉ. सुवर्ण जगताप यांनी व त्यांच्या टीमने याचा अभ्यास केला. अभ्यासातून असे निदर्शनास आले, की मातीमध्ये 30% पर्यंत लोहाचे प्रमाण आहे. यामुळे संजीवनी बेटाला वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि पर्यटनात्मक महत्त्व लाभले आहे.
गणेश ज्ञानेश्वर माशाळकर, (ज्ञानज्योत)
राजर्षी शाहू महाविद्यालय
जैवतंत्रज्ञान विभाग, लातूर



