“ऋणात राहणं… चुकलंय का?”
कवीवर्य श्री बळवंत शेषेराव डावकरे ता.मुखेड जिल्हा नांदेड
“ऋणात राहणं… चुकलंय का?”
“आपला परका भेद नसे
धावलो सर्वांच्या गरजेला,
घेतला स्वार्थ साधून आणि
त्रस्त करुन सोडले मजला..”
माणुसकी हरवलेल्या कृतघ्न माणसात असेही इरसाल नमुने आजच्या आधुनिक काळात अनुभवायास मिळतात. एखाद्याची शंभर कामे करुन द्या, ते लक्षात ठेवणारा एखादाच….पण तेवढे करुनही एखाद्या वेळी त्यांचा स्वार्थ साधला नाही की, लगेच आपल्यावर फिरुन स्वार होतात, अशावेळी आपले मन आपणासच विचारते खरंच चुकलंय का?
“काय अपराध केला असा
सहकार्यातून मिळे वागणूक,
चुकलंय का? करतो विचार
का होते माझी फसवणूक..”
काल प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याची संधी देणारा ‘चुकलंय का?’ हा विषय ‘त्रिवेणी’ समूहातर्फे देण्यात आला होता. मी पण साजेसे लेखन केले. सकाळी राहुलभाऊचा ‘तुमचा फोटो पाठवा” हा जादुई संदेश वाचला नि दिला फोटो पाठवून.
थोड्याच अवधीत माझी ‘काव्य त्रिवेणी’ सर्वोत्कृष्ट पोस्टरवर मिरवायला लागली नि मनस्वी खूप आनंद झाला. माझ्या लेखणीला वैचारिक बळ देणारे व मराठी भाषेला खांद्यावर घेऊन पुढे नेणारे राहुलभाऊ, सविताताई, विष्णूदादा, प्रशांतभाऊजी, संग्रामदादा, संजूदादा, दिनकरदादा, तारकाताई, वृंदाताई, स्वातीताई, सुनीताताई यासह माझ्यावर कौतुकाचा वर्षाव करून मनाला उभारी देणारे ‘मराठीचे शिलेदार’ समूहातील सर्व बहिणभाऊ यांचा मनापासून मी कायम ऋणी राहीन.
कवीवर्य श्री बळवंत शेषेराव डावकरे
ता.मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



