आई
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे
आई
“आ – आत्मा, ई – ईश्वर, आत्मा + ईश्वर = आई” असे आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत. पण ही जी व्याख्या आहे ही मुलांच्या वयापरत्वे बदलत जाते. मूल लहान असेल तर ते मुलाची सावली असते. जरा मूल मोठं व्हायला लागलं तर मुलाची सावली प्लस मुलाची बाई/ शिक्षक होते. मुलांना शिस्त लावणारी प्रेमळ आई होते. मूल जरा मोठे झाले म्हणजे पाचवी ते सातवी मध्ये गेले की, त्याला अक्कल यायला लागते. स्वतःच्या पायावर तो उभे राहून स्वतंत्र विचार करायला शिकत असतो. यावेळी आईला विचारतो पण स्वतःच्या मनातच खरे करतो. मग अशावेळी त्याचा निर्णय चुकला तर आई त्याला पाठीशी घालते किंवा समजावून सांगते किंवा जरा मार देऊन सांगते. इथे मुलाला शिस्त लागते. काही मुलं आपल्याच तोऱ्यात असतात ती आईचे मनावर घेत नाहीत आणि समजूनही घेत नाहीत.ती जरा वेगळ्या मार्गाला लागतात. मित्र-मैत्रिणी,वाद- संवाद असे मार्ग अवलंबतात. आई, शाळेतल्या बाई यांचे ऐकेनासे होतात.
आता मुलं आठवी ते दहावी मध्ये आलेले, ही मुलं अभ्यास तर करतात, पण दहावीच्या दृष्टिकोनातून काही मुलं खरंच उत्कृष्ट अभ्यास करतात आणि काही मुलं जी आहेत ती वाईट मार्गाला म्हणता येणार नाही; पण शारीरिक आकर्षणात अडकतात. मुलींशी जास्त बोलतात, मुली मुलांशी जास्त बोलतात आणि मग तिथूनच प्रेमाचे जाळे तयार होते. पण मुलांना काही कळत नाही की हे प्रेम नाही हे आकर्षण आहे. इथे मग शाळेतल्या बाई किंवा आई रागावल्या तर त्यांना खूप राग येतो. ते कोणाचेच ऐकेनासे होतात. पण जीवनात ठेच लागली की मग बरोबर सरळ होतात.
आता हेच मला कॉलेजला जायला लागली.मित्र- मैत्रिणींमध्ये मजा करू लागली. आपल्याच घरात काही सांगेनासे झाले. स्वतःच्याच मनाचे खरे असे वागू लागली. आपलेच मला चुकले तरी आई पाठीशी घालत असते. काही माऊली आपल्या मुलांना वठणीवर आणण्यासाठी धडा सुद्धा शिकवतात. कॉलेज झाले की नोकरीला लागतात. आणि नोकरी लागली की मग लग्न होतात मुलांची. इथून पुढे खरी गंमत आईची होते. आईने काही सांगू दे इथे त्याच आईला अक्कल नसते. ती बावळट असते. तिला काहीच समजत नसते.प्रसंगी आईच्या मनाचा विचार न करता खूप रागात उलटे बोलले जाते.
इथे एखादी आई जरा रागिष्ट असेल तर तिथल्या तिथे फटकन उत्तर देते. पण एखादी आई अगदी सहनशील असेल, तर ती फक्त रडत बसल्याशिवाय काही करू शकत नाही. याचे कारण तिचे आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे आणि ती आपल्या मुलांचं मन दुखवू शकत नाही परंतु मुलांना हे समजत नाही की आपल्या आईचं मन आपण मन दुखवू नये लहानपणापासून तिने आपली काळजी घेतलेली आहे आणि अजूनही यापुढे ती काळजी घेणार आहेत जोपर्यंत तिचे हात पाय चांगले आहेत तोपर्यंत ती काळजीच घेणार आहे आपल्या मुलांची लहान मुलां प्रमाणे. तर माझे एकच सांगणे आहे या नव्या पिढीला आपल्या आई-वडिलांना उलट बोलू नका. त्यांच्या मनाचा विचार करा त्यांच्याकडून काही चुकलं तर समजून सांगा पटकन बोलणे रागात बोलणे हे योग्य नाही. या माऊलीमुळे तुम्ही या जगामध्ये आलेला आहात त्या माऊलीचा आदर करा. तिला आदराने वागवावे एवढीच तिची अपेक्षा असते बाकी कोणतीही अपेक्षा नसते.
तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की प्रेमिकासाठी त्या मुलाने आपल्या आईला हृदय मागितले. आईने हृदय मुलाला कापून दिले. तर ज्या वेळी हा मुलगा ते हृदय घेऊन आपल्या प्रेमिकाकडे जात असतो, तो ठेच लागून खाली पडतो तेव्हा सुद्धा त्या हृदयामधून आवाज येतो की, ‘लागलं का रे बाळा तुला?’ या गोष्टीवरून तुम्ही लक्षात घ्या की आपली आई आपल्यावर किती प्रेम करते आईला दुखवू नका एवढेच माझे म्हणणे आहे. वृद्धापकाळात तिची सेवा करा. तिला घालून पाडून बोलू नका. तिचे मन जपा. एक आदर्श मुलगा होऊन दाखवा. एक आदर्श मुलगी होऊन दाखवा. ‘आईचा आदर्श समोर ठेवू,तिची वृद्धापकाळात काळजी घेऊ.’
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे



