Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबीर संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबीर संपन्न

शिबीर विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीचे उत्कृष्ट माध्यम: प्रा. तुळसीदास मोकल

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

अलिबाग (दि ३ डिसे.): जे. एस. एम. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी शिबीर दि. 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 रोजी दत्तक गाव सारळ येथील सारळ माध्यमिक शाळा, सारळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या समारोप समारंभामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल यांनी सांगितले कि, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबीर हे विद्यार्थ्यांच्या स्वयंशिस्तीचे उत्कृष्ट माध्यम आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रा. तुळसीदास मोकल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, श्रमसंस्कार शिबीरे ही विदयार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक, व्यक्तिमत्व विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. आपल्या मनोगताच्या शेवटी प्रा. तुळसीदास मोकल यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले कि, या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तीन सत्राचे आयोजन करण्यात आले यामध्ये श्रमसंस्कार सत्र, बौद्धिक सत्र, आणि मनोरंजन सत्र यांचा समावेश करण्यात आले. बौद्धिक सत्रांमध्ये मार्गदर्शक तज्ञाचे व्याख्यान, किमान कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, जनजागृतीपर रॅली, एड्स जनजागृतीपर व्याख्यान व समुपदेशन, नेत्र तपासणी, नेत्रदान समुपदेशन, लॅब ऑन व्हील कार्यक्रम, वादविवाद स्पर्धा इत्यादिंचे आयोजन करण्यात आले.

श्रमसंस्कारामध्ये ग्रामस्वच्छता, श्रमदान, समुद्रकिनारे स्वच्छता, सरला नदी स्वच्छता व बंधारा निर्मिती यांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर योगाभ्यास, प्राणायाम, प्रार्थना, वत्कृत्व स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, एकपात्री नाटिका, पथनाट्य,असे विविध मनोरंजनपर उपक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सर्व विदयार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शिबीर यशस्वीपणे आयोजित केले. विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व सांघिक भावना वाढीस लागण्यासाठी या शिबिराची निश्चित मदत होईल असे डॉ. प्रविण गायकवाड म्हणाले.

सारळ हायस्कुल सारळच्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, एन. एस. एस. च्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विविध उपक्रम राबाविले व शाळेतील विद्यार्थ्यांसाठी संगीत खुर्ची व इतर कार्यक्रम घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. शिबीर समारोप समारंभासाठी राष्ट्रीय सेवा योजना रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळसीदास मोकल, सारळ हायस्कुल सारळच्या मुख्याध्यापिका सौ. भारती पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. संतोष हाके, डॉ. जयश्री पाटील, प्रा. जयवंती झावरे व एन एस. एस. स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी आठवले यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे