Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

आभारीय मनोगत”: वृंदा करमरकर

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 4

“आभारीय मनोगत”: वृंदा करमरकर

जोडत जाते शब्द शब्द
आणि होते सहज कविता
सर्वोत्कृष्ट रचनेचा सन्मान
वाटते कवीपणाला धन्यता

काल भल्या पहाटे आदरणीय राहूल दादांचा ‘तुमचा फोटो पाठवा’ हा मेसेज आला होता. मी मात्र अंमळ उशिराच पाहिला आणि फोटो पाठवला.. आणि बक्षिसाची वाट पहात बसले. तर ‘वेड प्रेमाचे’ ही कविता चक्क पोष्टरवर झळकलेली दिसली आणि मनोमन सुखावले.

खरे तर या समूहात आल्यापासूनच मी याची देही याची डोळा.. अनेकांच्या सन्मानाचा सुख सोहळा अनुभवते.. समूहात पोष्टर येताक्षणी बरसतात अभिनंदनाच्या श्रावणसरी. खरेच बाई किती अप्रूप असते ना हे सर्व काही. सन्मान कुणाचाही असला तरी कौतुकाची शब्द सुमने सर्वच शिलेदार दिलखुलास उधळतात.. हीच गोष्ट माझ्या मनाला खूप भावते.. इतकै निर्मळ प्रेम करणार्‍या मोठ्या मनाच्या माणसात मी असल्याचे खूप मोठे समाधान वाटते.

वेड प्रेमाचे.. हा विषय खरे तर नवथर युगल मनाच्या ह्रदयाचे स्पंदन व्यक्त करणारा.. तरी माझ्या शैलीत मी मांडला आणि माझा प्रयोग काव्यपरिक्षकांना भावला… खूप आनंद वाटला. आदरणीय राहूल दादांची प्रचंड व्यस्तता.. समूहाप्रती भाषेप्रती असलेली मेहनत पाहता त्या तुलनेत आपण कांहीच करत नाही.. मात्र त्यांच्या डोंगराएवढ्या अभियानात खारीचा का असेना वाटा उचलता येतो याचे समाधान नक्कीच आहे. आजकाल प्रकृती अस्वास्थ्य, कौटुंबिक अडचणीमुळे लिखाणात सातत्य नाही मात्र माझे लाडके बंधू विष्णू दादा सतत आग्रह करत असतात ताई लिहा बरं… मग मन मोडवत नाही.

वैशालीताई, सवू काय सुंदर लिहितातच.. बाई बाई… पण समूहाची जबाबदारी सुद्धा किती काटेकोरपणे पार पाडतात याचे खूप कौतुक वाटते.. स्वाती तर काय अफलातून परिक्षणे लिहिते. तोड नाही.. या सर्वांच्या सहवासाचे भाग्य लाभले आणि कवीपणाचे सार्थक झाले. बाकी आ. पल्लवीताई, तारकाताई, शर्मिलाताई. आ. संग्राम दादा, आ. उरकुडे दादा, आ. अशोक दादा.. या सर्व प्रशासक सहप्रशासक परिक्षक मंडळींची मी खूप खूप ऋणी आहे.या शिलेदार कुटुंबात मी कशी आणि किती रमले ते समजलच नाही.
आ. राहूल दादांचे तर विशेष आभार मानते.. आणि मला अभिनंदनीय शुभेच्छा देऊन माझा आनंद द्विगुणित करणारे समूहातील सर्व भावा बहिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानते.

माय मराठीच्या सेवेसाठी चला रोज एक काव्य भाषा सक्षमीकरणाच्या यज्ञात समिधा म्हणून अर्पण करूया..
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार

सौ. वृंदाताई करमरकर
सदस्या मुख्य परिक्षक मार्गदर्शक मराठीचे शिलेदार समुह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे