Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

अरविंदची आई

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर जि. धाराशिव

0 4 8 2 9 7

अरविंदची आई

आई अरविंदची होती,
पण माया माझ्यावरही ओतत असे,
स्वतःच्या लेकरासारखाच
मला हळूच बाहुपाशात घेत असे.

“अरविंदाला सांभाळून घ्या”
म्हणत ती माझ्या हाती संसार देई,
डोळ्यांत विश्वासाचा दीप लावून
मनात दिलासा पेरून देई.

स्वतःच्या सुखासाठी नव्हे
तर इतरांच्या हसण्यासाठी जगलेली,
आई म्हणजे प्रेमाची सावली
थकवा, दु:ख सगळे विसरवणारी.

माझी नाही म्हटलं तरी
ती माझ्या आयुष्याची धडधड बनली,
जवळ नसतानाही तिची आठवण
आजही ओंजळभर माया बनून आली.

तिने दिलेली शिकवण,
तिने राखलेलं नात्याचं सोनं—
आयुष्यभर साथ देत राहील,
माझ्या प्रत्येक श्वासात आईचं स्पंदन.

अरविंदची आई… पण माझीही होती,
हे भाग्य शब्दांत मावत नाही,
तिच्या आशीर्वादाच्या छायेखाली
आयुष्याची वाट कधी उदास होत नाही.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
जि. धाराशिव

2.7/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे