गुरुपौर्णिमेचे महत्त्व
कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड,नागपूर
गुरुपौर्णिमेचे महत्त्व
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू:
गुरू देवो महेश्र्वरा:
गुरू साक्षात पर ब्रम्ह:
तस्मे श्री गुरूवे नम:
गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा सुध्दा म्हणतात. ज्ञान मार्गदर्शन निष्ठा आणि कर्तव्याचा अंखड झरा म्हणजे गुरु होय. प्रत्येकाच्या जीवनात कळत नकळत एक आदरणीय गुरुवर्य, शिक्षक किंवा सदगुरुचे स्थान अटळ आहे.गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारापासून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.जीवनात गुरूला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे म्हणुनच जीवनात गुरु अत्यंत महत्त्वाचे आहेत. गुरुपौर्णिमेला ऐतिहासिक महत्त्व आहे.कारण या दिवशी आदियोगीने स्वतःला आदिगुरु म्हणून संबोधिले होते.
महर्षी वेद व्यासला सृष्टीचा पालनकर्ता, भगवान विष्णूने चारही वेदाचे ज्ञान दिले होते म्हणूनच महर्षी व्यासला या जीवनात पहिले गुरु मानले जातात. गुरुबद्दल श्रध्दा ऋतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस गुरुची पुजा केली जाते त्याचा आशिर्वाद घेतल्या जातो. पूर्वी राजे महाराजे आपल्या पुत्रास आश्रमात विघा शिकण्यास शिष्य म्हणून पाठवित गुरु मन लावून त्याना ज्ञानार्जन करीत. आणि गुरूनी सांगितलेले कुठलेही काम मन लावून ते करायचे.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरू ला गुरूदक्षिणा देत असत.व्यक्ती ही नाशवंत आहे, पण विद्या ही अक्षयधन आहे. गुरुच्या छायेत बसल्याने मन व बुध्दीचा विकास होतो.
“गुरु,शिक्षक वगैरेची आम्हाला आवश्यकता नाही,हे सर्व बकवास आहे” असे काही लोक अंहकारापोटी म्हणतात.परंतु ते विसरले असतात की,लहानपणी त्यांच्या आईने त्यांचे बोट धरून त्यांना चालायला शिकविलेले असते.ती या बाबतीत त्यांची गुरुच असते.आपण पुस्तकातुन काही ज्ञान ग्रहण करतो त्यावेळी पुस्तक हाच गुरु असतो. कळत नकळत आपणास कुणी चांगलेच सल्ले देवून जातात त्यावेळेस ते आपले मार्गदर्शकच असतात. एकलव्याने द्रोणाचार्यची मुर्ती समोर ठेवून धनुर्विघा प्राप्त केली.असे प्रत्येक शिष्याला गुरु आहेत उदाहरणार्थ -देवताचे गुरु- बृहस्पती,असुराचे गुरु – शुक्राचार्य,रामाचे- ऋषी व्यशिष्ठ्,कृष्ण, बलराम आणि सुदामाचे-मुनि संदिपानी, कौरव,पांडवाचे-द्रोणाचार्य,चंद्रगुप्ताचे- चाणक्य, आदि शंकराचार्य-स्वामी गोविंद भागवत पाद, शिवाजी महाराजाचे-स्वामी समर्थ रामदास, सिख्खाचे- गुरु नानकदेव, विवेकानंदाचे गुरू – रामकृष्ण परमहंस असे कितीतरी गुरू व शिष्याची उदाहरणे आहेत.
“सदगुरु यावे मम भजनी सादर व्हावे” येथे सदगुरुंना भजनासाठी येण्याचे आमंत्रण देण्यात येत आहे. यामुळे सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात म्हणजे आपले जीवन थांबल्यासारखे झालेले असेल तर त्यातील अडथळे दूर होतात.जीवनातील विघ्ने गुरू मुळे टळू शकतात. म्हणून या भजनाला म्हटले आहे “तव आगमने विघ्ने पळती”. आपल्या इच्छांना लगाम लावायला हवा.जीवनात आपल्याला सर्व काही हवे असते.पैसा हवा असतो पण त्याच्या मागे पळू नये.”आशा तृष्णा बहु मनी झुरती” म्हणजे आपल्या आशा आपला हव्यास आपल्याला मी काय करू,मी कुठे जाऊ अशी भूणभूण लागत असते या आशा कमी झाल्या तरच मनुष्य योग्य चालतो.
माझे विद्यार्थी मोठमोठया पदावर आहेत. कारण माझी सेवा प्रामाणिकपणे व एकनिष्ठ सदोत्तीस वर्ष झाली कुणी इंजिनिअर, शिक्षक, इत्यादी पदावर पण माझे विद्यार्थी गुरुपौर्णिमेला व इतरही दिवशी फोन करतात. आपल्या कडील हालचाल सांगतात शिकत असणाऱ्या विद्यार्थी काही अडचण असल्यास प्रश्न विचारूण समाधान करतात सल्ला घेतात. मी त्यांना मार्गदर्शन करीत असते. मी आता सेवानिवृत्त झाल्यानंतर सुध्दा वर्ग पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे मोफत शिकवणी वर्ग एक सेवा म्हणून नियमित घेत असते.
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड,नागपूर
=======



