Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

माणूसकी

गोवर्धन तेलंग पांढरकवडा

0 4 8 2 8 4

माणूसकी

उगाच व्यर्थ वेळ इथे करीत बैसलो मी|
या माणसात माणूसकी शोधीत बैसलो मी।।

सुश्राव्य गीत जीवनाचे,गाऊनी हार झालो |
आता बेसूर गाढवांचे ऐकीत बैसलो मी ||

मज तलवार समजुनी म्यानेत नका ठेवू |
अरे! दुष्टांचेच काळीज कापीत बैसलो मी ||

नाईलाज आहे माझा मी सोडुनी जात नाही |
दुभंगल्या जिवांना पुन्हा जोडीत बैसलो मी ||

निद्रेत अज्ञानाच्या कसे एवढे झोपी गेले ?
कानात अमृतांचे शब्द ओतीत बैसलो मी ||

जरी आज भासे मज हा समाज मेंढरांचा |
तरीही लांडग्यांना आवरीत बैसलो मी ||

राग द्वेष क्रोध सारे , वाहते क्रूर वादळ|
स्वयंदीप होऊन तरी, जळीत बैसलो मी

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे