Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

स्वप्नांच्या गर्भातून

प्राची कोरे ता.जि.नागपूर

0 4 8 2 9 0

स्वप्नांच्या गर्भातून

किती सुंदर होत ते स्वप्नातलं रान,
प्रेमाचा बंगला, सप्तरंगी आनंदाचं दान.
परी कथा ची जणू बरसात व्हावी,
स्वच्छंद गाणी जशी मणी राहावी.
मातीच्या सुगंधाने नवे खेळ मांडले,
ते पहिले पाऊस हृदयात उमटले.

पण एके दिवशी आयुष्याने कळ बदलली,
ते कवितेची पान जणू कोमेजू लागली.
बदलले ढग, वाऱ्याचे श्वास दाटले,
आधुनिकतेचे सूर्य उगवू लागले.
ते रंगीत चित्र मावळू लागले.
काचेची महालं कोसळू लागली,
मग वास्तवाचे विदूषक गळा भेटीस आले.

माणसाच्या लालसे चे गळ होत आहेत मोठे,
राम राज्याच्या ह्या भूमी वर शब्द ठरतायत खोटे.
निष्पाप जीव भोगत आहेत कारावास,
नवयुगात पालकांना घडतोय वनवास.
निसर्गा चे चैतन्य आगीत झुलवले,
लोभाचे काळे वादळ मनात फुलवले.
समुद्र ही मदतीचा वज्रघोष करत आहे,
अशी ही दुर्दशा पाहून धरती ही रडत आहे.

प्राची कोरे
ता.जि.नागपूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे