0
4
8
2
8
6
वारसा
चालविण्या पुढील पिढी
हवा असतो वारसा
हक्क मिळाया संपत्तीचा
असावा लागे वारसा …….१
लाभतो वारसा असे
नाहीच सर्वांच्या नशिबी
वारसा मिळता सुखावून
जाता समजे संपत्ती ……..२
प्रत्येकास वारसा चांगला
मिळतिलच असे नाही
सम्पत्ति न जाणार
कमविलेली असे नाही……३
वारसा मिळविण्यासाठी
केले नवस जातात
संपत्ती हिसकुन घेताना
मायबाप विसरतात ……….४
का हट्टास करावा आपण
मग मिळाया वारसा
वृद्धपणी जर मिळत नसे
सुखाचा क्षण जरासा ……..५
डॉ.श्री. बालाजी राजुरकर
हिंगणघाट जि. वर्धा
=======
0
4
8
2
8
6



