
0
4
8
3
0
0
ठरलं तर मग
ठरलं तर मग करु आता
नववर्षाचा संकल्प मनी
क्लेश ह्रदयी साठलेले
देऊ क्षणात दूर फेकुनी
नकोत फक्त बोल फुकाचे
तडीस नेण्या प्रयत्न हवा
काढा मळभ गैरसमजुतीचे
आरंभ मैत्रीचा अध्याय नवा
येता साल नवे असे हे
मनात संकल्प नानापरी
हे करु अन् तेही करुच
आत्मविश्वास ठासून उरी
एक ना धड चिंध्या भाराभर
गत अशी ही नको व्हायला
कर असा तू एकच निश्चय
लाव तोंडात बोटे घालायला
ठरलं तर मग अंतिम आता
धरसोड वृत्ती काय कामाची
कर दृढनिश्चय यशस्वीतेचा
आचारसंहिता सालभराची
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
3
0
0



